विमानतळावर नोकरीची मोठी संधी! 1,446 पदांसाठी भरती सुरू

विमानतळावर नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. IGI Aviation Services Pvt. Ltd. कडून 1,446 पदांसाठी मोठी भरती(Recruitment ) प्रक्रिया सुरू झाली असून, यामध्ये ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना 21 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करावा लागेल.

कोणत्या पदांसाठी किती जागा? :
ग्राउंड स्टाफ – 1,017 पदे

लोडर – 429 पदे

एकूण – 1,446 पदे

शैक्षणिक पात्रता काय आहे? :

ग्राउंड स्टाफ – किमान 12वी पास (मान्यताप्राप्त मंडळातून)

लोडर – किमान 10वी पास (मान्यताप्राप्त मंडळातून)

वयोमर्यादा किती आहे? :
ग्राउंड स्टाफ – 18 ते 30 वर्षे

लोडर – 20 ते 40 वर्षे

निवड प्रक्रिया कशी असेल? :

निवड पूर्णपणे लेखी परीक्षेवर(Recruitment ) आधारित असेल.

परीक्षा स्वरूप:

100 बहुपर्यायी प्रश्न (MCQ)

विषय – सामान्य ज्ञान, गणितीय क्षमता, तर्कशक्ती, इंग्रजी, विमानचालन

– नकारात्मक गुण नाहीत

पगार किती मिळणार? :
ग्राउंड स्टाफ – ₹25,000 ते ₹35,000 दरमहा

लोडर – ₹15,000 ते ₹25,000 दरमहा

अर्ज प्रक्रिया कशी कराल? :

अधिकृत वेबसाईटवर जा: https://igiaviationdelhi.com

ऑनलाईन अर्ज फॉर्म भरावा.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत

अर्ज शुल्क भरावे –
ग्राउंड स्टाफ: ₹350

लोडर: ₹250

अर्ज अंतिम सबमिट करावा

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 सप्टेंबर 2025

हेही वाचा :