पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला;ऑस्ट्रेलियाच्या २२५ धावा, सील्स, जोसेफ, ग्रीव्ह्‌स प्रभावी

किंगस्टन : वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये किंगस्टन येथे दिवस-रात्र कसोटी सामना सुरू आहे. (match)दोन देशांमधील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली.

जेडेन सील्स (३/५९), शामर जोसेफ (४/३३) व जस्टीन ग्रीव्ह्‌स ३/५६) यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर (match)वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २२५ धावांवर गुंडाळला. त्यानंतर पहिल्या दिवसअखेरीस यजमान वेस्ट इंडीज संघाने एक बाद १६ धावा फटकावल्या.

ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजा (२३) व सॅम कॉनस्टास (१७ धावा) यांच्याकडून निराशा झाली. कॅमेरुन ग्रीन व स्टीवन स्मिथ या जोडीने ६१ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जेडेन सील्सने ग्रीनला ४६ धावांवर, तर शामर जोसेफने (match)स्मिथला ४८ धावांवर बाद करीत ऑस्ट्रेलियाचा पाय खोलात नेण्याचा प्रयत्न केला.

West Indies vs Australia
India Vs England Women Cricket: सामना गमावला; पण टी-२० मालिकेत यश, शेफालीची ७५ धावांची झुंज अपयशी

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया – पहिला डाव – सर्व बाद २२५ धावा (उस्मान ख्वाजा २३, कॅमेरुन ग्रीन ४६, स्टीवन स्मिथ ४८, पॅट कमिंस २४, जेडेन सील्स ३/५९, शामर जोसेफ ४/३३, जस्टीन ग्रीव्ह्‌स ३/५६). वेस्ट इंडीज – पहिला डाव – एक बाद १६ धावा (ब्रँडन किंग खेळत आहे ८, रोस्टन चेज खेळत आहे ३, मिचेल स्टार्क १/३).

हेही वाचा :