मॅच रोमांचक स्थितीत असताना जडेजा अचानक ड्रेसिंग रूममध्ये पळाला

सोमवारी लॉर्ड्स टेस्ट सामन्याच्या(match ) शेवटच्या दिवशी टीम इंडिया विजयाच्या अगदी जवळ असताना पराभूत झाला. टीम इंडियाला विजयासाठी 135 धावांची आवश्यकता होती. शेवटच्या सेशनपर्यंत रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी फलंदाजी केली परंतु तेवढ्यात मोहम्मद सिराजची विकेट पडली आणि लॉर्ड्स टेस्ट विजयाचं स्वप्न भंगलं. पाचव्या दिवशी सामन्यादरम्यान असं काही झालं की ज्यामुळे रवींद्र जडेजा अचानक मैदानात सोडून धावत ड्रेसिंग रूममध्ये गेला.

इंग्लंडविरूद्ध लॉर्ड्सच्या टेस्ट सामन्यातmatch ) असं काही घडलं ज्याची भारतीय चाहत्यांची अपेक्षा नव्हती. भारताने तिसरा सामना अवघ्या 22 धावांनी गमावला. पहिल्या डावात इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या आधारे 387 धावा केल्या. केएल राहुलच्या शतकामुळे भारतीय संघाने सुद्धा 387 धावा करून बरोबरी साधली. दुसर्‍या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या 192 धावांवर ऑलआउट झाला आणि भारतासमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले. सामन्याच्या शेवटच्या दिवशी रवींद्र जडेजा मैदानात लढत राहिला पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

लॉर्ड्स टेस्टच्या शेवटच्या दिवशी असं काही घडलं जे सामन्यादरम्यान कधी कधीच पाहायला मिळतं. खूप वेळापासून फलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाला लघुशंका आली होती. त्याने अंपायरशी शौचालयाला जाण्यासाठी परवानगी मागितली आणि तो थेट धावत मैदानाबाहेर गेला जडेजा मैदानातून बाहेर पडला तेव्हा भारताची धावसंख्या 9 विकेटवर 159 धावा अशी होती. सिराजने 17 बॉल खेळले होते तर जडेजाने 54 धाव केल्या होत्या. भारताला विजयासाठी 34 धावांची आवश्यकता होती.

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजमधील उर्वरित सामने :
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना : 23 ते 27 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट

पंत आणि जडेजाचं अर्धशतकं :
राहुलव्यतिरिक्त पहिल्या डावात ऋषभ पंतने 74 आणि रवींद्र जडेजाने 72 धावांची खेळी केली. भारताने इंग्लंडला चांगली टक्कर दिली. दुसऱ्या डावातही भारताने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडला 193 धावांचं लक्ष्य दिलं. या सामन्यात (match )चार दिवस भारतीय संघ विजयाच्या शर्यतीत होता. पण पाचव्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्याच तासात सामना फिरवला.

193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दुसरी डाव ताशाच्या पत्त्यांसारखी कोसळली. भारताला केवळ 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या इनिंगमध्ये भारतासाठी केएल राहुलने 39, रवींद्र जडेजाने 61, करुण नायरने 14 तर नितीश कुमार रेड्डीने 13 धावांची कामगिरी केली. इतर फलंदाज संघासाठी दोन अंकी धावसंख्या सुद्धा करू शकले नाहीत.

हेही वाचा :