ऑपरेशन सिंदूर नंतर भारत विरुद्ध पाकिस्तान पहिल्यांदाच भिडणार

World Championship of Legends 2025 या टी-20 टुर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)’ नंतर पहिल्यांदाच हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी मैदानात आमने-सामने येणार असून, क्रिकेटप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. भारताच्या यशस्वी इंग्लंड दौऱ्यानंतर चाहत्यांचं लक्ष आता या सामन्याकडे वळलेलं आहे.

भारत सध्या तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीच्या अंतर्गत पाच कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये खेळत आहे(Operation Sindoor). महिला टीम आणि अंडर १९ संघही इंग्लंड दौऱ्यावर आहेत. अशा पार्श्वभूमीवर, World Championship of Legends 2025 टुर्नामेंटमुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. या स्पर्धेत अनुभवी आणि सुपरस्टार खेळाडू पुन्हा एकदा मैदानात अवतरणार आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी आणि कुठे? :
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 20 जुलै 2025 रोजी रात्री 9 वाजता होणार आहे. हा सामना इंग्लंडमध्येच खेळवला जाणार असून, हायव्होल्टेज मॅच पाहण्यासाठी जगभरातील क्रीडाप्रेमी आतुर झाले आहेत. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण होणार असून, FanCode अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पाहता येणार आहे.

कोणत्या खेळाडूंमध्ये रंगणार टक्कर? :
इंडिया चॅम्पियन्स संघ:

युवराज सिंग (कॅप्टन), शिखर धवन, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, हरभजन सिंग, पियूष चावला, वरुण आरोन, विनय कुमार इत्यादी.

पाकिस्तान चॅम्पियन्स संघ:

शाहिद अफरीदी (कॅप्टन), शोएब मलिक, यूनिस खान, मिस्बाह-उल-हक, सरफराज अहमद, अब्दुल रज्जाक, वहाब रियाज, सईद अजमल, शरजील खान, सोहेल तनवीर इत्यादी.

या स्पर्धेत एबी डिव्हिलियर्स, ब्रेट ली, इयॉन मॉर्गन, किरेन पोलार्ड यांसारखे दिग्गज देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण लीगचा थरार वाढलेला आहे.

हेही वाचा :