शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी म्हटले की, “हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज(flag )तिरंगा नसून भगवा आहे आणि तोच झेंडा लाल किल्ल्यावर पुन्हा फडकवणार.” त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोल्हापूरमध्ये बोलताना भिडे गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले की, “देशात सध्या जो महायज्ञ सुरू आहे, त्याची सांगता भगव्या झेंड्यानेच होणार आहे. हा झेंडा लाल किल्ल्यावर फडकवण्याचा आमचा निर्धार आहे.” त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कार्याचा संदर्भ देत भगव्या ध्वजाच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर दिला.
“छत्रपतींच्या कार्याचा वारसा – भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फडकला” :
संभाजी भिडे यांनी भाषणात ऐतिहासिक दाखले देताना सांगितले की, “1784 ते 1803 या काळात मराठ्यांनी दिल्लीवर भगवा झेंडा(flag ) फडकवला होता. मुघल सत्तेचा अंत करून मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य प्रस्थापित केले होते.” त्यांनी हिरोजी फर्जंद, छत्रपती संभाजी महाराज, आणि रायगडाचे उल्लेख करत इतिहासाचे स्मरण करून दिले.
त्यांच्या मते, “हिंदुस्थानचा खरी ओळख ही भगव्या झेंड्याच्या माध्यमातूनच होईल. तिरंगा झेंडा हा योग्य नाही. हा झेंडा तात्पुरता आहे. आपल्या मातृभूमीचे आणि संस्कृतीचे खरे प्रतीक म्हणजे भगवा ध्वजच आहे.”
उपोषणाच्या शेवटी लाल किल्ल्यावर भगवा झेंडा :
संभाजी भिडेंनी स्पष्ट केले की, “आज आमचं उपोषण आहे आणि या उपोषणाची सांगता भगव्या झेंड्याच्या सन्मानानेच होणार आहे.” त्यांनी ‘भगवा म्हणजे छत्रपतींचं तेज, मराठ्यांचं शौर्य आणि हिंदवी संस्कृतीचं प्रतीक’ असल्याचं ठामपणे म्हटलं.
भिडे गुरुजींच्या या वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तिरंगा हा भारतीय संविधानाने मान्यता दिलेला अधिकृत राष्ट्रध्वज आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या विधानांवर कायदेशीर आणि राजकीय कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :