रविवारी 20 जुलै रोजी मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.(will ) हा मेगाब्लॉक देखभालीच्या कामासाठी असून या दिवशी तिन्ही मार्गावर असणार आहे. रविवारी बाहेर जाताना एकदा मेगाब्लॉकचे वेगळे वेळापत्रक पाहणे अत्यंत गरजेचे आहे. महत्त्वाचा म्हणजे हा मेगाब्लॉक मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असेल. हा मेगाब्लॉक कोणत्या विशिष्ट रेल्वे स्थानकापांसून ते विशिष्ट मार्गापर्यंत असणार आहे. हा मेगाब्लॉक डाऊन आणि अप मार्गावर असणार आहे.
मध्य रेल्वे
सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत सीएसएमटी आणि विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक(will ) असेल. सीएसएमटीहून विद्याविहारला जाणाऱ्या डाऊन स्लो गाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील, त्याचप्रमाणे घाटकोपरहून येणाऱ्या अप स्लो गाड्या अप जलद मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर रेल्वे:
सीएसएमटी-चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान डाउन लाईनवर सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० आणि अप(will ) लाईनवर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान वाशी/बेलापूर/पनवेल आणि वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या सेवा रद्द करण्यात येतील, तर पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे:
बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन स्लो मार्गांवर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक असेल. या काळात गोरेगाव ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावर धीम्या लोकल गाड्या धावतील.
प्रवास करताना ‘या’ पर्यायांचा विचार करा
हार्बर लाईन ब्लॉक दरम्यान, प्रवासी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य लाईन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करू शकतील. पश्चिम रेल्वे ब्लॉक दरम्यान बोरिवली येथील प्लॅटफॉर्म १, २, ३ आणि ४ वरून कोणत्याही लोकल गाड्या सुटणार नाहीत.
महत्त्वाचे अपेट्स
पश्चिम रेल्वेवरील बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप-डाऊन धीम्या मार्गावर “जंबो ब्लॉक” असेल. या काळात गोरेगाव आणि बोरिवली दरम्यानच्या अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील.तसेच हार्बर मार्गावरील अंधेरी आणि बोरिवलीहून काही लोकल फक्त गोरेगावपर्यंत धावतील. त्यामुळे हार्बर मार्गावर प्रवास करताना ‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या. तसेच बोरिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म १, २, ३ आणि ४ वरून कोणत्याही लोकल गाड्या सुटणार नाहीत.
हेही वाचा :