घर खरेदीसाठी बहुतेकांना होम लोन घ्यावे लागते. मात्र, लोन घेताना केलेल्या काही चुकांमुळे तुम्ही 20 वर्षांऐवजी तब्बल 33 वर्षे EMI भरत राहू शकता,(loan)याची अनेकांना कल्पनाही नसते. विशेषतः बँकेचे व्याजदर वाढल्यावर आपोआप तुमच्या लोनच्या कालावधीत वाढ होते, हे लक्षात घेतलं पाहिजे.सुरुवातीला लोक EMI वरच लक्ष केंद्रित करतात, पण व्याजदर वाढल्यानंतरही ते EMI न वाढवता तोच ठेवतात. यामुळे हळूहळू कर्जाचा कालावधी वाढतो आणि जास्त व्याज भरावे लागते. त्यामुळे लोन घेताना व दरवाढीनंतर काय निर्णय घ्यायचे यावरच संपूर्ण आर्थिक नियोजन अवलंबून असते.
उदाहरण घेऊन पाहू या – जर एखाद्याने ३० लाखांचं कर्ज ८% व्याजदराने २० वर्षांसाठी घेतलं, तर त्याचा EMI सुमारे ₹25,093 असेल. (loan)पाच वर्षांनंतर जर व्याजदर ११% झाला, तर थकबाकी सुमारे २६ लाख रुपये राहते. अशा स्थितीत जर तुम्ही EMI पूर्वीसारखाच ठेवला, तर उर्वरित कालावधी १५ वर्षांऐवजी २८ वर्षे होतो.म्हणजेच एकूण कालावधी ३३ वर्षांवर पोहोचतो, आणि त्यात तुम्हाला लाखो रुपयांचं अतिरिक्त व्याज भरावं लागतं. पण जर तुम्ही EMI थोडा वाढवला असता, तर कालावधी वाढला नसता आणि आर्थिक नुकसानही टळलं असतं.
अशा परिस्थितीत ग्राहकांनी बँकेशी संपर्क करून लवकरात लवकर कर्ज पुनर्रचना करून घ्यावी. व्याजदर वाढल्यानंतर EMI वाढवण्याचा पर्याय स्वीकारा, जेणेकरून कालावधी वाढणार नाही. बँका सहसा तुमचा EMI तोच ठेवतात आणि कालावधी वाढवतात, पण ग्राहकच बदलासाठी पुढाकार घेत नाहीत. (loan)याशिवाय, दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा आपल्या कर्जाची स्टेटमेंट तपासा, आणि त्यावर योग्य निर्णय घ्या. ‘स्वस्त EMI’ हा नेहमीच चांगला पर्याय नसतो, हे समजून घेतलं पाहिजे.
हेही वाचा :
- भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध सलग दुसरी मालिका जिंकण्यासाठी सज्ज! मालिकेत टीम इंडीयाची 1-0 अशी आघाडी
- 20 जुलै रोजी रविवारी तिन्ही मार्गांचा मेगाब्लॉक, प्रवास करण्यापूर्वी ‘हे’ वाचा
- सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीच्या भावात घसरण! जाणून घ्या आजच्या किंमती
- वैष्णवी हगवणे न्यायप्रकरणी मोठा ट्विस्ट! IPS सुपेकर सहआरोपी करण्याच्या शिफारशीने खळबळ