मोठी बातमी! लवकरच काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता भाजपाच्या वाटेवर

राज्यात लवरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते.(leader)हीच बाब लक्षात घेता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. दरम्यान, आता परभणी जिल्ह्यातून काँग्रेसला हादवरून टाकणारी माहिती समोर येत आहे. परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचा शिलेदारच भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे परभणी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी मुंबईत मंत्री तथा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.(leader) परभणी तशा चर्चा चालू आहेत. असे असतानाच वरपूडकर यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर आता त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश वरपूडकर यांच्या भेटीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या भेटीवेळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि भाजपाचे जिल्हाप्रमुख सुरेश भुमरे उपस्थित होते. येणाऱ्या 24 तारखेला सुरेश वरपूडकर यांचा मुंबई येथे भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय.

दरम्यान वरपूडकर यांच्या भाजपा प्रवेशाची तारीखही समोर आल्यानंतर आता परभणीच्या काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.(leader) वरपूडकर हे काँग्रेसचे जिल्हाप्रमुख असल्यामुळे परभणीत त्यांची चांगली ताकद आहे. याच कारणामुळे ते जर भाजपात जाणार असतील तर त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरपूडकर यांचा भाजपा प्रवेश म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तसेच वरपूडकर भाजपात गेले तर त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :