पांढरे केस काळे करण्यासाठी करा हळदीचा वापर.
बदलत्या जीवनशैलीचा परिमाण महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. वयाच्या विसाव्या वर्षीच अनेक तरुणींचे केस पांढरे दिसू लागतात.
बदलत्या जीवनशैलीचा परिमाण महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. वयाच्या विसाव्या वर्षीच अनेक तरुणींचे केस पांढरे दिसू लागतात. तर काहींचं केस अनुवंशिकतेमुळे पांढरे दिसू लागतात. अश्यावेळी पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर कलर किंवा डाय वापरला जातो. पण केमिकल युक्त प्रॉडक्टचा प्रभाव जास्त वेळ केसांवर राहत नाही. अनेकदा हे प्रॉडक्ट लावल्याने केस खराब देखील होतात. मेहंदीचा वापर हा केसांसाठी चांगला असतो. मेहंदी केसांना लावल्याने काहीकाळ चांगले दिसतात. मात्र जर ती केसांना नीट लागली नाही तर केस लाल होतात. अश्यावेळी तुम्ही केसांना काही घरगुती वस्तू लावून केस काळे करू शकता. केस काळे करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. ज्यामुळे फक्त त्वचाच नाही तर केसांचे सौंदर्य देखील वाढते.
केस पांढरे करण्यासाठी अश्या पद्धतीने करा हळदीचा वापर
हळद आणि खोबरेल तेल
पांढरे केस काळे करण्यासाठी हळदीसोबत नारळाचा देखील वापर करता येतो. या पदार्थांचा हेअर मास्क बनवून तुम्ही केसाला लावला तर केस काळे होतील. हा मास्क बनवण्यासाठी देखील सोपा आहे. हेअर मास्क बनवण्यासाठी २ तुकडे कच्ची हळद घेऊन ती बारीक करून घ्या. बारीक करून झाल्यानंतर त्यात गरम केलेले खोबरेल तेल घालून मिक्स करून घ्या. हे मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर मास्क केसांना लावा. केसांना मास्क लावून झाल्यानंतर १५ ते २० मिनिट केस असेच ठेवून घ्या. २० मिनिट झाल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. हा मास्क तुम्ही आठवड्यातून १ वेळा केसांना लावल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.
हळद अंड हेअर मास्क
हळदी सोबतच अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते. त्यामुळे केस काळे करण्यासाठी तुम्ही हळद आणि अंड्याचा मास्क बनवून लावू शकता. हा मास्क बनवण्यासाठी सोपा आहे. हेअर मास्क बनव्यासाठी २ अंडी, २ चमचा हळद, २ चमचा मध एकत्र करून मिक्स करा. त्यानंतर हा मास्क केसांना लावा. मास्क टाळूपासून केसांच्या टोकांपर्यंत लावून घ्या. नंतर केस धुवून टाका. हा मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा केसांना लावू शकता.
हळदीचा स्प्रे
हळदीपासून स्प्रे बनवून तुम्ही तो तुमच्या केसांना लावू शकता.हळदीचा स्प्रे बनवण्यासाठी एक चमचा हळद पावडर आणि कोरफड जेल १ कप पाण्यात मिक्स करून घ्या. त्यानंतर एक स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी ओतून घ्या. हे पाणी केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत सगळीकडे स्प्रे करून घ्या. स्प्रे करून झाल्यानंतर केसांवर तासभर स्प्रे तसाच ठेवा. यामुळे केस काळे होण्यास मदत होते.