ही’ आहेत सांगलीची उन्हाळ्यातली शीतपेये; काय आहे खासियत?

सांगली : दाह आणि थकवा कमी करण्यासाठी उन्हाळ्यात थंडपेये घेतली जातात. उसाचा रस, फळांचा ज्यूस, ड्रायफ्रुट ज्यूस, कोकम सरबत, लिंबू सरबत आणि नारळपाणी (soft drinks)हे झाले सामान्य पेये. यांसह सांगलीची खासियत म्हणजे, मठ्ठा आणि नाचणीचे आंबील. प्रत्येक पेयाचे महत्त्व शरीरासाठी उपयुक्त आहे. त्यातील महत्त्वाच्या पेयांचे होणारे फायदे सांगताहेत आहारतज्ज्ञ डॉ. अर्चना ऐनापुरे.

नारळपाणी : नारळाला कल्पवृक्ष म्हटले जाते. आजारी माणसाला शहाळे दिले जाते, ते सलाईनसारखेच काम करते. नारळपाण्यात भरपूर क्षार असतात. ब गटाच्या जीवनसत्त्वातील घटक ओल्या नारळाद्वारे मिळतात. मूत्रविकार, मूतखडा, कॉलरा आजारात नारळपाणी उपयुक्त ठरते. जुलाब, उलट्या झाल्यानंतर शरीरातील क्षार कमी होतात, उन्हाळ्यात घामावाटे क्षार कमी होतात, त्यामुळेही अशक्तपणा येतो. नारळपाण्याने तरतरी येते. नारळाचे पाणी जंतुनाशक आहे, आतड्यातील शिल्लक जंतूचा नाश करते. हृदय सदृढ होते; तसेच ज्ञानतंतू आणि पचनसंस्था चांगली होते. निर्जंतुक असल्याने सगळ्यांना ते उपयुक्त ठरते.

लिंबू सरबत : आयुर्वेदामध्ये लिंबाचे (soft drinks)महत्त्व अधिक आहे. ते आंबट, पाचक, दीपक, हलके, नेत्र सतेज करणारे, रुचकर, काहीसे तुरट आहे. पित्तशामक, जठरअग्नी प्रज्वलित करणारे, तोंड स्वच्छ ठेवणारे असते, म्हणजे जे अन्न खातो त्यातून जंतुसंसर्ग होतो, त्याला मारण्याचे काम लिंबू करते. त्यामुळे वात, पित्त, कृमी शरीरातील लिंबाच्या रसामुळे कमी होतात. लिंबू पाण्यासोबत घेतला पाहिजे; फक्त लिंबू रस घेतल्यास दातांचे नुकसान करतो. रिकाम्यापोटी रस घेतल्यास शरीर शुद्ध होते. उन्हाळ्यात लिंबूसरबत घेतल्यास क जीवनसत्व मिळते. त्यामुळे तरतरी येते. खेळाडूंसाठी ‘एनर्जी बूस्ट’ करण्याचे काम लिंबू सरबत करते.

मठ्ठा : मठ्ठा उन्हाळ्यातले ‘अमृत’ मानले जाते. शरीरातील टॉक्सीन बाहेर काढून टाकण्याचे काम मठ्ठा करते. नियमित ताकाचे सेवन केल्यास व्यक्तीचे आरोग्य कधीच बिघडत नाही. प्रोटीन, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह हे मठ्ठामधून मिळते. पावसाळ्यात एकेकाला बाधते. मात्र कोमट पाण्यात ताक घेतले तर लाभदायी ठरते. दम्याच्या विकारात उपयुक्त ठरते. पोटाच्या व्याधीसाठी मठ्ठा, ताक, लस्सी चांगली आहे; फक्त रात्रीच्या वेळी पिऊ नये. पचनसंस्था सदृढ बनते. महिलांना अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास असेल त्यांनी ताक प्यावे, मधुमेह, मूळव्याध, संधिवात यासाठी सेवन करता येईल.

नाचणीचे आंबील : उष्णतारोधक असल्याने उन्हाळ्यात आंबीलाला मागणी वाढते. त्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. नाचणीचे आंबील प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते, थकवा दूर होतो. तसेच हाडे मजबूत होतात. यामुळे मधुमेह कमी होण्यास मदत होते. नाचणी हे तृणधान्य असल्याने तसेच उपयुक्तता असल्याने २०२३ हे वर्ष ‘मिलेट इयर’ साजरे केले होते.

हेही वाचा:

अजितदादांच्या कोट्यातून उमेदवारी अर्ज, महादेव जानकरांचं शक्तिप्रदर्शन

हार्दिकने मुंबईच्या कॅप्टन्सीपेक्षा या एकाच गोष्टीचा विचार करावा

शिंदेंच्या हातून नाशिक निसटलं? जागा दादांना फिक्स, धाराशिवलाही राष्ट्रवादीचा उमेदवार फायनल