मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपची नवी रणनीती
पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार रिंगणात उतरले आहे. त्यात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही उमेदवार तगडे असल्याने तिन्ही पक्षाकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु आहे. प्रचारासाठी नवनव्या रणनिती आखल्या जात आहे. त्यातच भाजपकडून आता मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी नवी रणनिती आखण्यात आली आहे. भाजपकडून रात्रंदिवस एक करत मुरलीधर मोहोळांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
भाजपच्या वर्धापन दिनी पुण्यात भाजपकडून राबविण्यात येणार “घर चलो अभियान” राबवण्यात येणार आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजप पुणे शहरात 3 लाख घरांमध्ये एक विशेष पत्रक वाटले जाणार आहे. 6 एप्रिल रोजी भाजपचा वर्धापन दिन आहे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटीलदेखील अभियानात सहभागी होणार आहेत. पुण्यातील महायुतीचे सर्व स्थानिक आमदार देखील घरोघरी जात पत्रक वाटणार आहे.
10 ते 12 लाख नागरीकांना भाजप देणार पत्रक
या माध्यमातून भाजपचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत. या माध्यामातून प्रत्येक पुणेकरांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. साधारण पुण्यात 10 ते 12 लाख नागरीकांना हे पत्रक वाटप करण्यात येणार आहे.
पुण्यात भाजपचा उमेदवार जिंकून येणार अशी भाजपला खात्री होती. मात्र त्यानंतर भाजप विरोधात रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली आणि निवडूक टफ झाली. त्यानंतर आता वंचितकडून वसंत मोरे रिंगणात उतरले आहेत. तिन्ही उमेदवार चांगले तगडे मानले जात आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षाकडून दणक्यात प्रचार करण्यात येत आहे. रवींद्र धंगेकरांसाठी महाविकास आघाडीचे सगळे नेते कार्यकर्ते कामाला लागते आहे. कॉंग्रेसमधील नाराजीमुळे पक्षाच्या उमेदवाराला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी कॉंग्रेसचं केंद्रिय पथक पुण्यात दाखल झालं आहे. भाजपकडूनदेखील रोज नवनव्या रणनिती आखल्या जात आहे. बैठकांवर बैठका घेतल्या जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडून बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात आहे.