कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात आज दुपारी (दि. १४) एका भीषण अपघाताची घटना घडली. शाहू उद्यानासमोर बाजारपेठेत गर्दी असताना अचानक एका चारचाकी वाहनाचा नियंत्रण सुटल्याने लोकांवर (accident)धडक झाली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली आणि वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.
सध्या अपघाताचे नेमके कारण समजलेले नाही. या अपघातामुळे(accident) परिसरात वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
अखेर उच्च न्यायालयाकडून केली गेली जबाबदारी निश्चित
हत्तीच्या पायाखाली पापडासारखी चिरडली गेली चिमुकली बकरी Video Viral…
कपडे बदलत असताना मुलीचा बनवला व्हिडीओ, ब्लॅकमेल करत…