राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (ठाकरे गट)च्या सामनातून महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांची ‘विकेट’ लवकरच पडणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक मोठं ‘धक्कातंत्र’ राबवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, मंत्रीमंडळात(ministerial posts ) फेरबदल होणार असल्याचा इशारा यातून दिला आहे.
सामनाच्या वृत्तानुसार, शिंदे गटातील आणि भाजपमधील मंत्र्यांचा राजकीय डाव संपुष्टात येणार आहे. या यादीत माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदम, नरहरी झिरवळ, नितेश राणे, जयकुमार गोरे, भरत गोगावले आणि दादा भुसे यांची नावे स्पष्टपणे सामनाने घेतली आहेत. यातील अनेक मंत्र्यांवर वादग्रस्त कारभार, वक्तव्ये, आर्थिक आरोप, किंवा अपयशी कार्यक्षमता यामुळे टिका झाली आहे.
फडणवीसांच्या नव्या रणनीतीची तयारी? :
सामनात असं म्हंटल आहे की, फडणवीस सरकार मोठा राजकीय फेरफार करणार असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. त्यांच्याजागी सुधीर मुनगंटीवार यांना अध्यक्षपद दिलं जाईल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातही असंतोष वाढत चालला आहे. यामुळे फेरबदलाची प्रक्रिया केवळ मंत्री नव्हे, तर संस्थात्मक पातळीवरही केली जाऊ शकते.
मंत्री(ministerial posts ) माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रम्मी खेळताना सापडले होते. त्यांचं वादग्रस्त वर्तन आणि वक्तव्यांमुळे त्यांना वगळण्याची शक्यता आहे. संजय शिरसाट यांच्या घरात नोटांच्या बंडलची प्रकरणं, तसेच हॉटेल लिलाव घोटाळा आणि त्यांच्यावरचे अन्य आरोप यामुळे त्यांचं नाव चर्चेत आहे. योगेश कदम सावली बारप्रकरणामुळे अडचणीत आले असून, त्यांच्यावर सतत विरोधकांचा रोष आहे.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे रडारवर :
भाजप आमदार नितेश राणे सतत वादग्रस्त विधानं करून चर्चेत असतात. त्यांच्या मंत्रीपदावरही आता टांगती तलवार आहे. जयकुमार गोरे यांच्यावर महिलेकडून गंभीर आरोप झाले होते. त्यांना ग्रामविकास खात्याचा कारभार दिला असला तरी, त्यांची प्रतिमा डागाळली आहे. नरहरी झिरवळ यांच्यावर कार्यकर्त्यांशी संवाद न ठेवण्याचे आणि क्षेत्रात सक्रिय नसल्याचे आरोप होत आहेत.
दादा भुसे यांनी घेतलेल्या शालेय शिक्षणाशी संबंधित निर्णयांवर प्रचंड वाद झाले होते. त्यांच्या खात्याच्या कामगिरीबाबत समाधानकारक मूल्यांकन नाही. तसेच हिंदी सक्तीच्या निर्णयामुळेही ते टिकेच्या धनी झाले आहेत. यामुळे यंदाच्या फेरबदलात त्यांचीही ‘विकेट’ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :