विद्यार्थ्यांनो… दहावीच्या निकालासंदर्भात महत्वाची माहिती समोर!

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे लाखो विद्यार्थ्यांचे(Students) लक्ष लागले आहे. नुकताच बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. हा निकाल या महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून, अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे.

बारावीच्या निकालानंतर आता दहावीचा निकालही जवळपास आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून SSC निकाल 2025 लवकरच mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइट्सवर प्रसिद्ध केला जाणार आहे.

दरम्यान, निकालाची नेमकी तारीख व वेळ जरी अद्याप जाहीर झालेली नसली तरी येत्या काही दिवसांत त्यासंदर्भात घोषणेबाबत संकेत मिळाले आहेत.

दहावीच्या निकालाची प्रक्रिया बारावीप्रमाणेच होणार असून, पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्सद्वारे निकालाची घोषणा केली जाईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांची(Students) टक्केवारी, एकूण विद्यार्थी संख्या, विभागनिहाय निकाल यांचा तपशील दिला जाईल. यंदा दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून 17 मार्च 2025 दरम्यान दोन शिफ्ट्समध्ये घेण्यात आली होती.

2024 साली SSC निकाल 27 मे रोजी लागला होता. त्यावेळी 15,60,154 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 15,49,326 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एकूण 14,84,431 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. निकालाची एकूण टक्केवारी होती 95.81%.

मुलींचा निकाल 97.21% तर मुलांचा निकाल 94.56% होता. कोकण विभागाने सर्वाधिक म्हणजेच 99.01% निकालासह टॉप केला, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 94.73% होता.

हेही वाचा :

ब्रेकिंग : अखेर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा

कागल तालुक्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने शेतकरी पतीचा केला खून; चुलत दीरासोबत होते अनैतिक संबंध

36 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रिन रोमान्स, वडिलांच्या kiss मुळे मोडलं मुलाचं लग्न