हेलिकॉप्टरने माणसं आणू, पण मतदान … हसन मुश्रीफ
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रत्येक उमेदवार आणि पक्षांकडून मतदारांना आकर्षित (helicopter)करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हसन मुश्रीफ यांनीही कागलच्या एका सभेतून मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक विधान केलं. त्या विधानाचे राजकीय वर्तुळातून पडसाद उमटत आहेत. काही नेत्यांनी तर मुश्रीफ यांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच सुरू झाली आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून संजय मंडलिक लढत आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत तुल्यबळ होणार असल्याचं चित्र आहे. काल कागलमध्ये मंडलिक (helicopter)यांच्या प्रचाराची सभा पार पडली.
यावेळी राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी एक विधान केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्ते केलं जात आहे. हेलिकॉप्टरने माणसं आणू पण संजय मंडलिक यांना विजयी करू. आता देव आला तरी मंडलिक यांचा पराभव होणार नाही, असं मुश्रीफ यांनी म्हटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कागलमध्ये महायुतीची जोरदार सभा पार पडली. यावेळी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ फुलफॉर्ममध्ये होते. मुश्रीफ यांनी तडाखेबंद भाषण करत विरोधकांच्या टोप्या उडवल्या. यावेळी त्यांनी एक विधान केलं आणि संपूर्ण कोल्हापुरात चर्चांना उधाण आलंय. उमेदवाराबद्दल निगेटिव्ह बोलायचं नाही. जे काही बोलायचं ते पॉझिटिव्ह बोलायचं तुम्हाला माझी शप्पथ आहे, असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिला.
देवालाही शक्य होणार नाही
लाख सव्वा लाख मताधिक्य घेतलं तर संजय मंडलिक यांचा पराभव (helicopter)करणं प्रत्यक्षात देवालाही शक्य होणार नाही अशी व्यूह व्यहरचना करायची आहे. मी नेहमी गंमतीने म्हणतो की, मुंबई असो पुणे असो की अमेरिका असो… लागली तर हेलिकॉप्टरने माणसं आणू, पण आपलं संपूर्ण मतदान करून घेऊ. संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा संकल्प करायचा आहे, असं मुश्रीफ म्हणाले.
बडे लोग, बडी बाते
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुश्रीफ यांना या विधानावरून टोला लगावला आहे. त्यांचे विधान म्हणजे बडे लोग, बडी बाते आहे. मोठ्याच लोकांना हेलिकॉप्टरचं सूचतं. ते धनवान आहेत, मोठी लोकं आहेत, असा चिमटा सुप्रिया सुळे यांनी काढला.
चौकशी करा
अनेक नेते वेळ वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर वापरतात. अनेक पक्ष देखील वापरतात. पण एखाद्या पक्षाला मतदार फेऱ्या करायला जर हेलिकॉप्टर परवडत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारते आणि विनंती करते की याची चौकशी झाली पाहिजे. या नेत्याची इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी मी करेन. एवढे पैसे या लोकांकडे आले कुठून? हे चिंताजनक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
खर्च पार्टीच्या खर्चातून जाईल
राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी मात्र या विधानावर सावरासावर केली आहे. स्टार प्रचारकांना हेलिकॉप्टरमधूनच जावे लागते. तशी निवडणूक आयोगाकडून रितसर परवानगी घेवून त्याचा खर्च पार्टीच्या खात्यातून जाईल, असं शंभुराज देसाई म्हणाले.
प्रत्यक्षात हेलिकॉप्टर उडवतील का…
मनसे नेते प्रकाश महाजन यांनीही मुश्रीफ यांना चिमटा काढला आहे. हसन मुश्रीफ हे शब्दांचे हेलिकॉप्टर चांगले उडवू शकतात. प्रत्यक्षात हेलिकॉप्टर उडवू शकतील का माहीत नाही, असा टोला प्रकाश महाजन यांनी लगावला आहे.
हेही वाचा :
भुजबळ लोकसभेला उभे राहुद्या मग सांगतो मनोज जरांगेंचा मोठा इशारा
धैर्यशील माने लोकसभेत दिसणार नाहीत ?
सुनेविरोधात प्रचाराला नकार देणारे मुलीच्या विरोधात प्रचार करतील का?