सांगली जिल्ह्यातील उचगाव, मणेर मळा येथील साईश अपार्टमेंटमध्ये सोमवारी सायंकाळी वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला, ज्यात महिलेसह चार जणांना अटक करण्यात(Raid) आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने केली.

अटक केलेल्या संशयितांमध्ये सुजाता सचिन (Raid)साळुंखे (वय 34, मिरज), सुमित नेमिनाथ देशमाने (वय 29, इचलकरंजी), लखन मोहन कांबळे (वय 36), तौफिक ताजुद्दीन सुतार (वय 36, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून दोन पीडित महिलांना सुटका केली.
कारवाईत एम.एच. 09 सीएम 6314 कार, एम.एच. 09 ईएल 4240 रिक्षा, पाच मोबाईल, रोख 10,470 रुपये व 8,56,530 रुपये मुद्देमाल जप्त केला गेला. संशयितांना कसबा बावडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी समोर हजर करून तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
साईश अपार्टमेंटच्या मालकाने वेश्या व्यवसायासाठी जागा (Raid)पुरवली होती, मात्र तो सध्या फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र घारगे, अमित मर्दाने, राकेश माने, हिंदुराव चरापले, उत्तम सडोलीकर, अश्विन डुणूंग, प्रज्ञा पाटील यांनी सहभाग घेतला.
हेही वाचा :
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, थेट टॉप 10 मधून…
‘महिलेचे कपडे फाडले, मंगळसूत्र तोडलं अन्…एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा..
मोठी स्क्रीन आणि दमदार बॅटरी! Vivo च्या नवीन टॅबलेटने बाजारात केली एंट्री..