टीम इंडियाच्या 3 खेळाडूंना दुखापत, मँचेस्टरमध्ये शुबमनसेनेची वाईट स्थिती

टीम इंडियाची मँचेस्टर कसोटीत वाईट स्थिती झाली आहे. त्यात आता खेळाडूंना झालेल्या(Test) दुखापतीमुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. टीम इंडियाच्या 3 प्रमुख खेळाडूंना दुखापत झाली आहे.

पहिल्या दिवशी ऋषभ पंतला दुखापत
टीम इंडियाची मँचेस्टर कसोटी सामन्यातील सुरुवात ही दुखापतीने झाली. पहिल्या दिवसातील(Test) तिसऱ्या सत्रात उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याच्या पायाला दुखापत झाली. ख्रिस वोक्स याने टाकलेल्या चेंडूवर पंतने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पंतच्या पायाला दुखापत झाली. तपासणीनंतर पंतला फ्रॅक्चर झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र पंत रिटायर्ड हर्ट झाल्यानंतरही बॅटिंगसाठी आला. पंतने अर्धशतक झळकावलं. मात्र पंत विकेटकीपिंग करणार नसल्याचं स्पष्ट आहे.

बुमराहच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह
त्यानंतर तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या 2 खेळाडूंना दुखापतीमुळे त्रास जाणवला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अडचणीत सापडला. बुमराह आधीच वर्कलोड मॅनेजमेंटमुळे चर्चेत होता. या सामन्यात ते जाणवलंही. इंग्लंडच्या पहिल्या डावात बुमराहच्या बॉलिंगमध्ये ती धार जाणवली नाही. टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी दुसरा नवा बॉल (Test) घेतला. बुमराह 1 ओव्हरनंतरच मैदानाबाहेर गेला. बुमराहला डाव्या घोट्यात वेदना जाणवत होती. मात्र बुमराह तिसऱ्या सत्रात बॉलिंगसाठी परतला. तेव्हाही बुमराहच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होत्या.

मोहम्मद सिराजलाही त्रास
बुमराहनंतर टीम इंडियाच्या अडचणीत आणखी वाढ झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही फिटनेसमुळे त्रास जाणवू लागला. दुसऱ्या सत्राच्या शेवटी सिराजने इंग्लंडच्या डावातील 99 वी ओव्हर टाकली. त्यानंतर सिराजला त्रास झाला. सिराजला चालताना त्रास जाणवू लागला. त्यामुळे सिराजला मैदानाबाहेर जावं लागलं. मात्र सिराज काही वेळानंतर मैदानात परतला. मात्र या घडल्या प्रकारामुळे सिराजच्या फिटनेसबाबतही भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :