खळबळजनक घटना; लग्नाची बोलणी सुरू असताना शरीर संबंध, बोलणी फिस्कटली अन्…

पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे लग्नाच्या(marriage ) बोलणीवेळी झालेल्या मैत्रीनंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्नाची बोलणी फिस्कटल्यानंतर, दुसऱ्या ठिकाणी विवाह ठरलेल्या तरुणीचा, पहिल्या तरुणाने शारीरिक संबंधांचे व्हिडिओ दाखवून ते लग्न मोडले. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली असून, पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे.

लग्नाची बोलणी सुरू असतानाच, संबंधित तरूण आणि तरुणीमध्ये मैत्री झाली होती. ते दोघेही फिरायला गेले होते, जिथे त्यांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. काही कारणास्तव त्यांच्या लग्नाची बोलणी फिस्कटली आणि त्यानंतर त्या तरुणीचा दुसऱ्या ठिकाणी विवाह ठरला. हे समजताच, पूर्वीच्या तरुणाने त्या तरुणीचा विवाह(marriage )ज्या मुलासोबत जुळला होता, त्याची माहिती काढली आणि त्याची भेट घेतली.

विवाह ठरलेल्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकली :
या भेटीवेळी त्याने दोघांनी शारीरिक संबंध ठेवले होते, तेव्हा चोरून काढलेला व्हिडिओ ठरलेल्या मुलाला दाखवला. होणाऱ्या बायकोचा असा व्हिडिओ पाहून विवाह ठरलेल्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. या सर्व प्रकारानंतर त्या तरुणाने ठरलेले लग्न मोडले, ज्यामुळे पीडित तरुणीला मोठा मानसिक धक्का बसला.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :
दुसऱ्या ठिकाणी ठरलेले लग्न मोडल्यानंतर पीडित तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीविरुद्ध विनयभंग, छेडछाड, खोटे आरोप लावून बदनामी करणे, आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने लग्नाची बोलणी करण्यासाठी फिर्यादी तरुणीला एका ठिकाणी बोलावले. तेथे कोल्ड्रिंक्स देऊन, नंतर दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध झाले. मात्र त्याच वेळी, पीडितेच्या संमतीशिवाय आरोपीने व्हिडिओ चित्रण केले.

नंतर या व्हिडिओच्या आधारे तो पीडितेला ब्लॅकमेल करू लागला आणि तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. याशिवाय, पीडितेचे दुसऱ्या ठिकाणी ठरलेले लग्न मोडण्यासाठी त्याने त्या ठिकाणीही तिची बदनामी केली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून, सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा :