सलमान खानचा छिद्र असलेला टी-शर्ट पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान(prada t shirt) खानचे लाखो चाहते आहेत. सलमानच्या चाहत्यांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सलमान कुठेही असला तरी त्याचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. आता सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हजारो कोटींचा मालक असलेला सलमान खाननं फाटलेलं टी-शर्ट पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. त्यावरून अनेक नेटकरी हे त्याची स्तुती करत आहेत.
सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट(prada t shirt) शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सलमान खान, त्याचे वडील सलीम खान आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार दिसत आहेत. इंस्टंट बॉलिवूडनं शेअर केलेल्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचं कारण म्हणजे सलमान खाननं यात ग्रे रंगाचं टी-शर्ट परिधान केलं आहे. तर त्याच्या या टी- शर्टमध्ये छिद्र आहे. तर असे देखील लोक आहेत. ज्यांनी त्याच्या या साधेपणाचे कौतुक केले आहे. तर काहींना त्याला ट्रोल केले आहेत.
सलमान खानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की, ‘सलमान खाननं छिद्र असलेलं टी-शर्ट परिधान केलं तर तो साधेपणा आणि आम्ही केलं तर आम्हाला गरीब बोलणार.’ दुसरा नेटकरी म्हणाला की ‘अरे यार! हा साधेपणा नाही तर फॅशन आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला की, ‘टायगर म्हातारा होतोय.’
आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘हे तर तेव्हा होतं. जेव्हा तुमचं लग्न झालेलं नसतं, कारण तुमची बायको टी-शर्ट जुनं झालं की टाकून देते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘श्रीमंत व्यक्तीनं केलं तर साधेपणा आणि गरीब व्यक्तीनं केलं तर कंजूस?’ तिसरा नेटकरी म्हणाला, सलमानचं एक छिद्र असलेलं टी-शर्टपण कोटींमध्ये विकलं जाईल.
दरम्यान, सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी कतरिना कैफसोबत ‘टायगर 3’ दिसला होता. त्यासोबत त्याच्याकडे आणखी एक चित्रपट असून त्यात तो पॅरामिलिट्री ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. तर सलमाननं आजच ईदच्या निमित्तानं त्याच्या चाहत्यांना ईदी दिली आहे. सलमाननं ‘सिकंदर’ या त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
हेही वाचा :
शाळेतील कर्मचाऱ्याची अपंग विद्यार्थ्याला मारहाण
नवरीचा सौदा 1.30 लाखात विकत घेतलं लग्न केलं, पुन्हा तिला विकणार होते, पण…
बीड जिल्ह्यात भर उन्हाळ्यात नदी-नाल्यांना पूर; वादळी वाऱ्यासह गारपीट.