ITR कडून करदात्यांना दिलासा! पॅन-आधार लिंक केले नसेल तर… 

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नसलेल्या करदात्यांना(pan aadhaar link) सरकारने दिलासा दिला आहे. आयकर विभागाने दंड आकारण्याची अंतिम मुदत शिथल केली आहे. ३० जून २०२३ च्या अंतिम मुदतीपर्यंत ज्यांनी पॅन-आधार लिंक केले नाहीये. त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात आल आहे.

यामध्ये आता कोणत्याही स्त्रोतावर टीडीएस कापून किंवा कर वसूल करण्याची आवश्यकता असलेल्या व्यवहारांसाठी(pan aadhaar link) जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. ज्या व्यक्तीचे पॅन निष्क्रिय झाले असेल त्यांना घरभाडे भत्त्यावरील टीडीएस दुप्पट होऊन २० टक्के झाला आहे.

अनेक करदात्यांना पॅन निष्क्रिय आहे हे माहित नसल्यामुळे त्यांनी आयटीआरसाठी टॅक्स डिडक्शनचा फॉर्म भरला आहे. यात अनेकांना कर विभागाकडून दंडाला सामोरे जावे लागले. यासाठी करदात्यांनी सरकारकडे याचिका केली होती. त्यासाठी या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. मागच्या मार्च महिन्यात यावर निर्णय घेण्यात आला. मे महिन्यापूर्वी जर पॅन कार्ड सक्रिय झाले तर यामध्ये करदत्यांना काही प्रमाणात सूट मिळेल.

ज्या करदात्यांना जास्त प्रमाणात कर रोखून ठेवणे किंवा गोळा करणे आवश्यक होते त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेनस्टे टॅक्स अॅडव्हायझर्सचे पार्टनर कुलदीप कुमार म्हणतात. करदात्यांनी अद्याप पॅन आधारशी लिंक केले नसेल तर त्वरीत करावे. जे हे दोन्ही लिंक नसेल तर करदात्यांना कोणताही परतावा मिळणार नाहीये. तसेच यावर मिळणारे व्याज देखील गमवावे लागणार आहे.

आयकर विभागाने पॅन-आधार लिंक न केलेल्या करदात्यांना दंडाची शेवटची मुदत ३० जून २०२३ पर्यंत कमी केली आहे. ज्यामुळे कपात करांना दंडापासून वाचवले जाणार आहे. निष्क्रिय पॅनमुळे टीडीएस दर जास्त होईल असे देखील म्हटले आहे. टीडीएस भरताना जुनी आणि नवीन कर प्रणालींमध्ये निवड करणे महत्त्वाचे आहे. असे मत कुलदीप कुमार यांनी मांडले आहे.

हेही वाचा :

अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

पृथ्वी शॉ च्या ‘त्या’ झेलवरून रंगली सोशल मीडियावर चर्चा..

लाईट बिल जास्त… महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार