बोटावर शाई दाखवा, दाढी कटिंग फुकट; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सलून व्यावसायिकाचा उपक्रम

हिंगोली : लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा(salon) टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जाते. वेगवेगळ्या पद्धतीने ही जनजागृती केली जात असून यात सलून व्यावसायिकाने देखील स्वतः पुढाकार घेतला असून मतदान देण्याची बोटावर शाई दाखविल्यास दाढी- कटिंग मोफत करून देणार आहे.

देशाच्या लोकशाहीचा(salon) आज उत्साह सुरू आहे. प्रामुख्याने या उत्साहात सहभागी होऊन मतदान करावे यासाठी प्रशासनासह अनेक जण या उत्सवाची जनजागृती करत आहे. प्रामुख्याने निवडणूक म्हटली कि राजकीय पक्षांकडून मत मागितले जातात. परंतु अनेक मतदार हे आपला हक्क बजावत नसल्याने प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी कमी राहत असते. यामुळे हा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले जात असून हिंगोलीच्या औंढा शहरातील सलून व्यावसायिकाने देखील एक प्रयत्न केला आहे.

महेश खुळखुळे या सलून व्यावसायिकाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बोटावरील शाई दाखवा आणि दाढी कटिंग फुकट करा; असा उपक्रम राबवला आहे. खुळखुळे यांच्या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. तर अनेक जण मतदान करून या सुवर्णसंधीचा फायदा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

9 दिवस सलग खा हे 11 पदार्थ, वजन येईल थेट 50 किलोच्या खाली

धक्कादायक! नव्याने पदवीधर झालेल्या तरूणांच्या नोकऱ्या धोक्यात; काय आहे कारण?

भाजपच्या सभेला ३०० रुपये देऊन रोजंदारीने माणसं? रोहित पवारांनी शेअर केला VIDEO