अवघ्या एका रुपयात लग्न.. शिर्डीतील कोते दाम्पंत्याचा आदर्श उपक्रम
सर्वधर्म समभावाची शिकवण(couples therapy) देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आयोजित सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 41जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्याचे 24 वे वर्ष असून आज तागायत कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याने 2300 मुलींचे कन्यादान केले आहे. त्यामुळे स्वतःला मुलगी नसतानाही कोते दाम्पत्याला हजारो मुलींचे आई वडील होण्याचे भाग्य लाभले आहे.
शिर्डीमधील रहिवासी(couples therapy) असलेले कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याला मुलगी नसल्याने त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कन्यादान करण्याचा आदर्श निर्णय घेतला. गेल्या २४ वर्षांपासून कोते यांच्याकडून सर्व धर्मीय सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला केला. विशेष म्हणजे अवघा एक रुपया भरुन या विवाह सोहळ्यात नाव नोंदवता येते.
यामध्ये लग्न करणाऱ्या वधु-वरास कोते दांपत्याकडून नवे पोशाख, सोन्याच्या मंगळसूत्राची भेट, संसार उपयोगी वस्तू, वऱ्हाडी मंडळींना जेवणही दिले जाते. यंदा या उपक्रमाचे २४ वे वर्ष असून ४१ जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. अवघ्या एका रुपयात नवा संसार फुलवणाऱ्या कौते दांपत्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, स्वतःला लेक नसताना आजपर्यंत राज्यातील २३०० मुलींचे कन्यादान करण्याचे सौभाग्य कोते दांपत्याला लाभले. या विवाह सोहळ्यात दरवर्षी मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित असतात.. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा संदेश देणारा शिर्डीतील हा सामुदायिक विवाह सोहळा अनेकांना आधार देणारा ठरतोय.
हेही वाचा :
लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना…- हायकोर्ट
भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना उद्धव ठाकरे मतदान करणार? कारण…
जान्हवी कपूरच्या होणाऱ्या दिराला डेट करतेय सारा अली खान?