वेदांत अग्रवाल याचा जामीन फेटाळला, बाल सुधारण गृहात ठेवण्याचा निर्णय
पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणाती अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याला बाल सुधारण (improvement)गृहात ठेवण्यात येणार आहे, असा मोठा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणाती अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याला बाल सुधारण गृहात ठेवण्यात येणार आहे, असा मोठा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. बाल हक्क न्यायालयाने आधीचा निर्णय रद्द केला आहे. वेदांतला मिळालेला जामीन रद्द करण्यात आला आहे. त्याला आता बाल सुधारण गृहात ठेवण्यात येणार आहे. वेदांतला सुरक्षेच्या कारणास्तव बाल सुधारणगृहात म्हणजेच बाल निरीक्षणगृह येथे ठेवण्यात येणार आहे.
बाल हक्क न्यायालयात दुपारी 12 वाजेपासून सुनावणी सुरु होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर न्यायलायने निर्णय राखून ठेवला होता. यानंतर न्यायालयाने संध्याकाली निकाल जाहीर केला. या निकालात वेदांत अग्रवाल याला याआधी अल्पवयीन असल्यामुळे देण्यात आलेला जामीन रद्द करण्यात आल्याचा आदेश देण्यात आला. वेदांतला बाल सुधारणगृह म्हणजे बाल निरीक्षणगृहात ठेवणार असल्याचं कोर्टाने म्हटलं.
आरोपी वेदांतचे वकील प्रशांत पाटील यांनी आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला देण्यात आलेला जामीन योग्य असल्याचा युक्तिवाद केला होता. पण पोलिसांनी आपली बाजू मांडताना सविस्तर युक्तिवाद केला. वेदांत अग्रवाल हा नशेच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्या जामीनाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. जामीन रद्द करुन त्याला निरीक्षणगृहात ठेवावं, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेदांतला प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं, अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली. पण त्यावर आज कोणताही निर्णय झाला नाही.
हेही वाचा :
निर्यातबंदी हटवल्यानंतर 45 हजार टन कांद्याची निर्यात
साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या; मुरलीधर मोहोळ यांचं धंगेकरांना जोरदार प्रत्युत्तर
कोल्हापुरात नवा पॅटर्न; बंटीपाटील, मालोजीराजे vs महाडिक, मुश्रीफ, क्षीरसागर
दहावीच्या विद्यार्थ्यांनो निकालासाठी तयार व्हा!