साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या; मुरलीधर मोहोळ यांचं धंगेकरांना जोरदार प्रत्युत्तर

रविंद्र धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत काही प्रश्न उपस्थित केले होते(business). त्यांच्या प्रश्नांना आता भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोहोळ यांनी यावेळी धंगेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. रविंद्र धंगेकर यांनी या प्रकरणातील एफआयआरच्या कॉपीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत पोलिसांनी सुरुवातीला एफआयरमध्ये कलम 304 लावलं नसून फक्त 304 अ लावल्याचा दावा केला. पण फडणवीसांनी सुरुवातीपासून कलम 304 लावल्याचा दावा केला. याच मुद्द्यावरुन धंगेकरांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले. “घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.

\

अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय आणि तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले. राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती का? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन आणि बिल्डरला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का?”, असे अनेक प्रश्न रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केले आहेत. त्यावर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलं.

मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

“लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे(business) नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच. कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो”, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

“मंगळवारीही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच. ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी, कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत”, असं जोरदार प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी दिलं.

मोहोळ यांचा धंगेकरांना मोठा इशारा

मुरलधीर मोहोळ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’लादेखील प्रतिक्रिया दिली. यावेळी (business)त्यांनी धंगेकरांना मोठा इशारा दिला. काँग्रेसच्या आमदारांना सवय आहे दरवेळी स्टंट करायचा आणि खोटं बोलायचं. हा विषय राजकारण करण्याचा नाहीय. प्रत्येक बाबतीत दिशाभूल करायची, खोटं बोलायचं पुणेकर आता ओळखत आहेत तुम्हाला. बस करा आता. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घटना घडल्यानंतर तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. उठसुठ खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला किती प्रसिद्धी द्यायची? हे आता मीडियाने ठरवलं पाहिजे. गृहमंत्री या प्रकरणात सजग, संवेदनशील आहेत, असं मुरळीधर मोहोळ म्हणाले. तसेच कुणाचं मला काढायला लावू नका. योग्य वेळ आल्यावर सर्व बाहेर काढू, असा मोठा इशारा मोहोळ यांनी धंगेकरांना दिला.

हेही वाचा :

कोल्हापुरात नवा पॅटर्न; बंटीपाटील, मालोजीराजे vs महाडिक, मुश्रीफ, क्षीरसागर

दहावीच्या विद्यार्थ्यांनो निकालासाठी तयार व्हा!

धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडालेली बोट अखेर १७ तासांनंतर सापडली!