हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाचा प्रश्न; नताशाने दिले 4 शब्दात उत्तर Video

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या(divorce) हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून चर्चेचा मोठा विषय आहे. याचदरम्यान आता हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेणार असल्याची सध्या चर्चा रंगली आहे.

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाच्या(divorce) चर्चा सुरु असताना ती काल मुंबईत दिसून आली. नताशा आणि तिच्या एका मित्रासोबत एका कॅफेमध्ये गेली होती. यावेळी तिला हार्दिकसोबत घटस्फोट घेणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नताशाने ‘Thank You Very Much…’असं म्हणत उत्तर दिलं. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या आणि नताशा बरेच दिवस एकत्र दिसले नाहीत. दोघांनी 14 फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर शेवटचा फोटो शेअर केला होता.

नताशा पांड्याकडून 70 टक्के प्रॉपर्टी घेणार असल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. रिपोर्टनुसार, पांड्याला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के नताशाला द्यावी लागेल. यासंदर्भात अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअरही करण्यात आल्या आहेत. तसेच ‘एक्स’वर (आधीचे ट्विटर) हार्दिक पांड्या आणि नताशा घटस्फोट म्हणून ट्रेंडही होत आहेत. हार्दिक कोट्यवधीच्या मालमत्तेचा मालक आहे. आयपीएलसाठी मिळालेल्या मॅच फीसह तो इतर अनेक मार्गांनी कमाई करतो.

हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.

हेही वाचा :

सांगली जिल्हा बँकेत मोठा घोटाळा; सहा शाखांमध्ये २. ४३ कोटींचा अपहार; ८ जण निलंबित

बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; तटकरेंच्या दाव्याने खळबळ

सावधान! गुगल मॅप वापरत असाल तर ; गमवावे लागतील प्राण, नेमकं काय घडलं?