IPL 2024 च्या Closing Ceremony मध्ये अमेरिकन बँडचा धुरळा

आज IPL 2024 चा अंतिम सामना आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद हा सामना(perform) २६ मे रोजी चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. सामन्यापूर्वी एक ग्रँड इव्हेंट पार पडणार आहे. या इव्हेंटमध्ये प्रेक्षकांना अमेरिकन रॉक बँड ‘इमॅजिन ड्रॅगन्स’चा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.

IPL 2024 च्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये ‘इमॅजिन ड्रॅगन्स’ परफोर्मन्स(perform) करणार असल्याची माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावरून दिलेली आहे. बँडचा प्रमुख गायक डॅन रेनॉल्ड्सने व्हिडीओमध्ये सांगितले की, IPL 2024 च्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैद्राबाद टीममधील सर्व कलाकार पाहायला मिळत आहेत.

‘इमॅजिन ड्रॅगन्स’ यापूर्वी २०२३ मध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईतल्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्स केला होता. या बँडची सुरूवात २००८ पासून सुरूवात झालेली आहे. या बँडला १७ वर्षे झालेली आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघाला २० कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला १३ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

विजेत्या, उपविजेत्यासह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघावरही पैशांचा वर्षाव केला जाणार आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या संघाला ७ कोटी आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघाला ६.५ कोटी रुपये दिले जाणार आहे. या यादीत राजस्थान रॉयल्सचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे या संघाला ७ कोटी रुपये तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला ६.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील.

हेही वाचा :

सरकारच्या ‘या’ एका योजनेमुळे महिला होतात मालामाल

प्रियांका चोप्राने सकाळी-सकाळी दाखवला ‘तो’ लूक; नेटकरी घायाळ

लोकसभा निवडणुकीत महायुतीविरोधात लढले, आता शांतिगिरी महाराजांनी केली मोठी घोषणा…