संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य तरुणीने व्हिडीओ बनवला 

चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर कंपनीच्या बसची वाट पाहत उभ्या असलेल्या २४ वर्षीय तरुणीसमोर एका अनोळखी व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर कंपनीच्या बसची वाट पाहत उभ्या असलेल्या २४ वर्षीय तरुणीसमोर एका अनोळखी व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. (assaulted) या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित तरुणीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना बुधवारी (दि. २१) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघाली होती. तिने एम्पायर इस्टेट परिसरात आपली दुचाकी पार्क केली आणि कंपनीच्या बसची वाट पाहण्यासाठी बीआरटी बसथांब्यावर जाऊन थांबली. सुरुवातीला बसथांब्यावर कोणीही नसल्याने ती एकटीच उभी होती. (assaulted) काही वेळाने एक अनोळखी व्यक्ती तेथे आला आणि तिच्यासमोर तिरप्या बाकावर बसला.संबंधित व्यक्ती वारंवार तरुणीकडे पाहत सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करू लागला. हा प्रकार लक्षात येताच तरुणी घाबरली. मात्र, धाडस दाखवत तिने त्या व्यक्तीला जाब विचारला. त्याचवेळी तिने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. आपले चित्रीकरण होत असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्ती तेथून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.

बीड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तू मेरे साथ शादी कर वरना भगाके ले जाऊंगा असे म्हणत पीडित तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना बीड जिल्ह्यातील परळीत घडली आहे.(assaulted) या प्रकरणातील आरोपीचे नाव अमृ शेख असे आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार 18 वर्षीय पिढीत तरुणी ही घरकाम करते. 22 मे रोजी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीला अडवून माझ्याशी विवाह कर अन्यथा तुला पळवून नेईल अशी धमकी दिली होती. यानंतर तरुणीचा हात ओढत तिचा विनयभंग देखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा

डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं

५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख बदलली