शरद पवारांच्या ‘या’ उमेदवारासाठी तब्बल 30 लाखांच्या 11 बुलेटची पैज

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा नुकताच पार पडला असून, लोकसभा निवडणुकीत(candidate) विजयी कोण होणार? याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. माढा लोकसभेत चुरशीची लढत झाली. असे असताना मात्र माढ्याचा खासदार कोण होणार? तुतारी वाजणार की कमळ फुलणार? याचे आडाखे बांधले जात आहेत.

पक्षाचे पदाधिकारी, उमेदवारांचे समर्थक आपलाच उमेदवार(candidate) निवडून येणार असे दावे करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या समर्थक बंधूंनी चक्क 11 बुलेटची पैज लावली आहे.

मोहिते-पाटील यांचे समर्थक तथा माढा तालुक्यातील योगेश पाटील आणि नीलेश पाटील या युवा शेतकरी भावंडांनी माढ्यातून तुतारीच निवडून येणार, असा आत्मविश्वास घेऊन भाजपसह समर्थकांना 11 बुलेटच्या पैजेचे चॅलेंज उभं केलं आहे. हे चॅलेंज भाजपसह रणजितसिंह निंबाळकरांच्या एका समर्थकांकडून स्वीकारण्यात आल्याचीदेखील माहिती समोर आली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील तर भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर या दोघांमध्ये राजकीय लढत झाली होती. निवडणूक निकालावर सोलापुरात 1 लाखाची पैज लागलेली आहे. अशातच आता माढा मतदारसंघासाठी देखील 11 बुलेट गाडींचे चॅलेंज लावण्यात आलं आहे. एका बुलेटची किंमत पावणे 3 लाख आहे. त्यामुळे 11 बुलेटची किंमत 30 लाख 25 हजार इतकी आहे.

योगेश पाटील आणि निलेश पाटील या दोन्ही भावांनी अकरा बुलेटचे दिलेले चॅलेंज निंबाळकर समर्थकाने स्वीकारले आहे. माढ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील निवडून येणार, असा दावा दोन्ही भावांनी केला होता. मात्र माढ्यातून भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार, असा दावा आता फलटणचे माजी नगरसेवक आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर समर्थक अनुप शहा यांनी केला आहे.

योगेश पाटील आणि निलेश पाटील या दोन्ही भावांनी पहिल्यांदा बुलेट शोरूमला 11 बुलेटचे पैसे भरूनच चॅलेंज लावावे, असे आवाहन अनुप शहा यांनी केले आहे. आम्ही देखील 11 बुलेटचे पैसे भरायला लगेच तयार आहोत. पंढरपुरात येऊन बुलेट शोरूमला पैसे भरा आणि पावती पाठवा आम्ही देखील लगेच पैसे भरायला तयार असल्याचे अनुप शहा यांनी सांगितले.

हेही वाचा :

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच आघाडी

45 पैशांत प्रवाशांना 10 लाखांचा विमा; काय आहे रेल्वेचा विमा

दीपिका आधीच कतरिना होणार आई? विकीसोबतच्या व्हिडीओने चर्चांना उधाण