बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच आघाडी

पदवी शिक्षणाच्या वतीनं टाकलेलं पहिलं पाऊल आणि महाविद्यालयीन जीवनाचा(leading safe) ओलांडलेला पहिला टप्पा म्हणून अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं 21 मे 2024, मंगळवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा निकाल जाहीर करण्यात आला. सीबीएसई आणि आयसीएसईमागोमाग एचएससीच्या बारावी परीक्षेच्या निकालाची टक्केवारीही यंदा वाढल्याचं पाहायला मिळालं.

यंदाच्या वर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी(leading safe) इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. ज्यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,46 विद्यार्थी, कला शाखेसाठी 3, 81,226 आणि वाणिज्य शाखेसाठी 3, 29,905 विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. व्यावसायिक अभ्यासक्रमातीलै 37,226 आणि आटीआयमधील 4750 विद्यार्थ्यांचाही निकाल यावेळी जाहीर झाला.

शिक्षण मंडळानं राज्याच्या एकूण निकालाची आकडेवारी जाहीर केल्यानंतर दुपारी 1 वाजता हा निकाल विद्यार्थांसाठी ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात आला. जिथं विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेले गुण पाहता येत आहेत.

निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांवर क्लिक करा- 

शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली, तर मुलं मातंर यंदाही पिछाडीवर पडली. बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 95.4 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर, 91.60 टक्के मुलं उत्तीर्ण झाली. विभाजनिहाय निकालानुसार कोकण विभागानं यंदा बाजी मारली असून, मुंबईचा निकाल मात्र सर्वाधिक कमी लागल्याचं स्पष्ट झालं.

निकालाची विभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे 

कोकण 97.51 %
लातूर  92.36 %
नाशिक 94.71 %
अमरावती 93.00 %
कोल्हापूर 94.24 %
मुंबई 91.95 %
छत्रपती संभाजीनगर 94.08 %
नागपूर 92.12 %
पुणे 94.44 %

सर्व विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट 2024 आणि फेब्रुवारी-मार्च 2025 या दरम्यान असणाऱ्या दोन संधीच हाताशी असतील. जुलै-ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. ज्यासाठी 27 मेपासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहेत याची नोंद घ्यावी.

हेही वाचा :

विराट ‘ते’ 5 शब्द अन् पुढच्याच बॉलवर धोनीची विकेट!

45 पैशांत प्रवाशांना 10 लाखांचा विमा; काय आहे रेल्वेचा विमा

दीपिका आधीच कतरिना होणार आई? विकीसोबतच्या व्हिडीओने चर्चांना उधाण