शेअर बाजारात पुन्हा एकदा नवीन विक्रम; निफ्टीने पार केला 22,600चा टप्पा

आज शेअर बाजारात नवीन विक्रम झाला. बाजार उघडताच प्रमुख निर्देशांक नवीन (stock market)सार्वकालिक उच्चांकावर व्यवहार करत होते. निफ्टी प्रथमच 22600 आणि मिडकॅप निर्देशांक 50000 च्या पुढे व्यवहार करत आहे.

आज शेअर बाजारात नवीन विक्रम झाला. बाजार उघडताच प्रमुख निर्देशांक नवीन सार्वकालिक उच्चांकावर व्यवहार करत होते. निफ्टी प्रथमच 22600 आणि मिडकॅप निर्देशांक 50000 च्या पुढे व्यवहार करत आहे. सेन्सेक्सनेही 500 अंकांची उसळी घेत 74,400 च्या जवळ पोहोचला आहे. मेटल आणि बँकिंग क्षेत्रात तेजी आहे. एचडीएफसी बँक निफ्टीमध्ये सर्वाधिक तेजीत आहे, तर इंडसइंड बँक सर्वाधिक घसरला आहे.

कोणते शेअर्स तेजीत?

आज शेअर बाजारात एनटीपीसी 1.28 टक्के आणि ॲक्सिस बँक 0.89 टक्क्यांनी वर आहे. पॉवरग्रीड 0.73 टक्के आणि कोटक महिंद्रा बँक 0.65 टक्क्यांनी वधारले आहे. (stock market)या व्यतिरिक्त टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन आणि टीसीएस सारखे टाटाचे अनेक शेअर्स वर आहेत.

याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले, इन्फोसिस, एशियन पेंट्स, एम अँड एम, एचयूएल आणि एल अँड टी या कंपन्यांच्या शेअर्समध्येही बीएसईवर जोरदार वाढ होत आहे.

बँकिंग आणि मेटल शेअर्स तेजीत आहेत. आज बाजाराला मोठ्या वाढीकडे नेण्यात सर्वात मोठा वाटा या शेअर्सचा आहे. बाजार उघडताच बँक निफ्टीने 48,254.65 चा उच्चांक गाठला आणि तो 48,636.45 च्या सर्वकालीन उच्चांकाच्या अगदी जवळ आला.

हेही वाचा :

हातकणंगले कल्याण, पालघर, आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर .

फळांचा राजा ‘आंबा’ पुण्यात दाखल

यवतमाळ-वाशीममधून शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांना दिली उमेदवारी