शेअर बाजारात नवा स्कॅम; ‘या’ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून होतेय फसवणूक

सध्या शेअर बाजारातील(stock market) विक्रमी तेजीमुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. मात्र आता शेअर बाजाराशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेअर बाजाराशी संबंधित अनेक प्रकारच्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच आता NSE इंडियाने अशाच एका फसवणुकीबाबत गुंतवणूकदारांना सतर्क केले आहे.

राष्ट्रीय शेअर बाजार(stock market) वेळोवेळी भांडवली बाजारातील व्यापाऱ्यांना अशा फसवणुकीबाबत सतर्क करत असते. देशातील मुख्य शेअर बाजार NSE ने फसवणुकीच्या प्रकरणांबाबत गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा सावध केले आहे. NSE ने वारंवार व्यापारी आणि गुंतवणूकदारांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात न येण्यास सांगितले आहे.

बाजारात अशा काही संस्था आहेत त्या कधी कधी हमी परताव्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतात, तर कधी इतरांची फसवणूक करतात. अशातच आता एक नवे प्रकरण समोर आले आहे. शेअर बाजार बंद झाल्यानंतर डिस्काउंटवर शेअर देण्याचे आश्वासन देऊन मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. त्यामुळे यावर NSE ने गुंतवणूकदारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

NSE ने सांगितले की, JO HAMBRO नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. मार्केट बंद झाल्यानंतर कमी किमतीत शेअर्स दिले जातील, अशी फसवणूक ग्रुपमधील लोकांना केली जात आहे. हे सीट ट्रेडिंग अकाउंटच्या नावावर केले जात आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर, NSE ने सांगितले की, या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून अनेक रिटेल गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही देखील सतर्क राहा.

याशिवाय Lazzard Asset Management India नावाची संस्था स्वतःला SEBI मध्ये नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर म्हणून दाखवत आहे. मात्र ते बनावट नोंदणी प्रमाणपत्र वापरत आहे. NSE ने सांगितले की Lazard Asset Management India या नावाने SEBI कडे नोंदणीकृत ब्रोकर नाही. लोकांनी त्याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे.

हेही वाचा:

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!

अजितदादांना मोठा झटका, कट्टर समर्थक शरद पवारांच्या गळाला?

भाजपला मोठा फटका बसणार; अंतर्गत सर्व्हेने वाढवली डोकेदुखी