महायुतीला धक्का; अजितदादांचा अर्ज नामंजूर !

केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती(alliance) लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेल्या अजित पवार यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(alliance) दहा महिन्यांपूर्वी फूट पडली. अजित पवार यांनी महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन बाहेर पडत राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर सत्तेतदेखील अजितदादा सहभागी झाले. शिंदे-फडणवीस सरकारने अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासह सुनेत्रा पवार यांनीदेखील लोकसभेसाठी अर्ज भरला होता.

उमेदवारी अर्जांची आज छानणी झाली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अजित पवार यांनी भरलेला अर्ज नामंजूर केला. निवडणूक आयोगाकडून अर्जाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अजित पवारांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला.

बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजयी अशी लढत होणार हे निश्चित झाले आहे.

हेही वाचा :

मॅच फिक्सिंग? काँग्रेस उमेदवाराच्या नावासमोर ‘कॅन्सल स्टॅम्प,’ कार्यकर्त्यांचा आक्षेप

मोठी बातमी! शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

‘इंडिया आघाडी’ स्वार्थासाठी एकत्र; काँग्रेस विकासाच्या वाटेतली भिंत.. नांदेडच्या सभेत PM मोदी कडाडले!