‘इंडिया आघाडी’ स्वार्थासाठी एकत्र; काँग्रेस विकासाच्या वाटेतली भिंत.. नांदेडच्या सभेत PM मोदी कडाडले!

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांचा(current topic) धडाका लावला आहे. आज महायुतीचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. ज्यामधून त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज(current topic)की जय, संत सेवालाल महाराज, हर महादेव, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरूवात केली. पहिल्या सत्रात NDA च्या बाजूने मतदान झाले आहे. ज्या लोकांनी मतदान केले नाही, त्यांनी मतदान करा, कोणालाही करा पण मतदान करा. देशाचे भविष उज्वल करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

इंडिया आघाडीचे लोक भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांच्यामध्ये निवडणूक लढण्याची हिंमत नाही. काँग्रेसने आधीच पराभव मान्य केला आहे. इंडिया आघाडीचे 25 टक्के उमेदवार असे आहेत की जे एकामेकांच्या विरुद्ध लढत आहेत. इंडिया आघाडीला धडा शिकवणे गरजेचे आहे. एव्हढा मोठा देश कोणाच्या हातात द्यायचा, हे कोणी सांगायला तयार नाहीत, असा खोचक टोलाही मोदींनी यावेळी लगावला.

हेही वाचा :

उदयनराजेंच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची सभा; ठिकाण अन् तारीखही ठरली

आर्थिक मंदीची चाहूल? देशातील आघाडीच्या टॉप 3 आयटी कंपन्यांमध्ये 63,759 कर्मचारी झाले कमी

“आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते, पण…”, ठाकरेंचा मोठा दावा