ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ

ऐन विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरे(political campaign) यांना मोठा धक्का बसला आहे. उध्दव बाळासाहेर ठाकरे पक्षाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उपनेतेचा पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा दिलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अंतर्गत राजकारणामुळे आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

कल्याणमधील पदे देताना, संघटनात्मक बाबी आणि सचिन बासरे यांना उमदेवारी(political campaign) देताना आपल्याला विश्वासात घेतले नाही. या सगळ्या घाणेरड्या राजकारणामुळे व्यथित होऊन पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असं विजय साळवी यांनी पत्रात म्हटले आहे.

कल्याणमधील शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून विजय साळवी यांची ओळख होती. शिवसेनामध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा विजय साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. त्यांनी शिंदे गटात यावे म्हणून त्यांच्यावर विविध प्रकारे दबाव, पोलिस दबावतंत्राचा वापर करण्यात आला, असा खुलासा देखील साळवी यांनी केला.

आपण निष्ठावान राहिल्याने पक्षाने आपणास जिल्हाप्रमुख, उपनेतेपद दिले. मात्र, अचानक आपले जिल्हाप्रमुख पद काढून घेतले. पक्ष संघटनेत पदे देताना आपणास विश्वासात घेतले नाही याची खंत साळवी यांनी पत्रात व्यक्त केलीये. त्यांनी बासरे यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरूनही नाराजी व्यक्त केली आहे.

सचिन बासरे यांना कल्याण पश्चिमेची उमेदवारी देताना विनायक राऊत यांनी आपणास खोटे बोलून मातोश्री बाहेर जाण्यास सांगितले. गुपचूप व चोरून बासरे यांना अधिकृत उमेदवारी अर्ज देण्यात आला. या सर्व अपमानास्पद प्रकरणाने आपण व्यथित झालो आहोत, असं साळवी यांनी पत्रात म्हटले आहे.

इतकंच नाही तर, सचिन बासरे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्या बैठकीत आपणास बोलविले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी निरोप पोहचविला नाही. प्रचार सुरू असताना उमेदवार बासरे आपणास भेटतही नाहीत. म्हणजे प्रचारासाठी आपली गरज नाही हेच दिसते, असंही साळवी यांनी म्हटलं आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत. मात्र, आता त्यांनी राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिलाय.

हेही वाचा :

रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर

आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी

…म्हणून भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी सांगितलं कारण

Jio, Airtel आणि VI च टेन्शन वाढलं! स्टारलिंकची लाँचिंग डेट जवळ