कचऱ्याचे सोनं करणारी उद्योजिका…

तिने अमेरिकेतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी (job)सोडली. भारतातल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी, पर्यावरणासाठी काहीतरी करायचे हा उद्देश होता. तिने प्लास्टिकचा पुनर्वापर करून बॅग्स तयार करण्यास सुरुवात केली. अवघ्या एक लाख रुपयांनी सुरुवात झालेली तिची कंपनी आज कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. ही गोष्ट आहे रिचरखा ब्रँडसच्या अमिता देशपांडे यांची.

अमिताचा प्रवास वळणांनी भरलेला आहे. महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील एका गावात अजित आणि अरुंधती देशपांडे यांच्या पोटी अमिता जन्मली. अमिताच्या बाबांचा मासेमारीची जाळी तयार करण्याचा व्यवसाय होता, तर आई गृहिणी होती. बाबांच्या व्यवसायामुळे अमिता आणि तिच्या धाकट्या बहिणीचे बहुतांश बालपण पुणे, लोणावळा आणि सिल्वासा येथे गेले. शिक्षणासोबतच या दोन्ही बहि‍णींना देशपांडे दाम्पत्यांनी अध्यात्मिक शास्त्र, संस्कृत श्लोक आणि योगासने यांचे धडे दिले. अमिता अगदी बारा-तेरा वर्षांची असताना आदिवासी मुलांना इंग्रजी शिकवत असे. यावरून तिची चुणूक लक्षात येते.

दहावीनंतर अमिता फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाण्यासाठी पुण्याला परतली. त्यानंतर तिने पुण्यातील कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमन येथे २००१ ते २००५ या कालावधीत आयटी विषयात विशेष शिक्षण घेतले. खरंतर अभियांत्रिकी ही तिची पहिली पसंती नव्हती. तिला भूगोल किंवा भूगर्भशास्त्र यांसारख्या विषयांचा अभ्यास करायचा होता. पण तिच्या पालकांनी तिला आधी व्यावसायिक पदवी घेण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयात असताना अमिता वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेसह विविध स्वयंसेवी उपक्रमांमध्ये सहभागी व्हायची. तिने पुण्याच्या आजूबाजूचे विविध किल्ले आणि हिमालयात अनेक ट्रेक केले. या ट्रेक दरम्यान, विशेषत: जंगलात प्लास्टिकचा कचरा पाहून मन खिन्न होई, अमिताला समजले की, यातील बहुतेक कचरा पर्यटक आणि ट्रेकर्सकडून आला होता. कचरा निर्मिती कमी करण्यासाठी उपाय शोधण्याची तिची इच्छा तीव्र झाली.

हेही वाचा :

चेहरा जाडजूड दिसतोय? मग ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा सुंदर चेहरा

हिंदुस्थान ठरला लिजंड्स जगज्जेता..

पाच वर्षांच्या मुलांनी किती वेळ स्क्रीन पाहावी? नेत्रतज्ज्ञ काय सांगतात…