यवतमाळवरून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चार ते पाच तरुणांच्या टोळक्याने राडा (bus)घालून एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बसचालकाने टाटा मॅजिकला साईड देण्यासाठी हॉर्न वाजवला होता. मात्र, यावरून संतप्त झालेल्या टोळक्याने बसमध्ये चढून चालक-वाहकाला बेदम मारहाण केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ४ जून रोजी वटफळी दोडकी येथील हनुमान मंदिराजवळ, नेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. (bus)प्राथमिक माहितीनुसार, एसटी बसचालकाने टाटा मॅजिकला साईड देण्यास सांगण्यासाठी हॉर्न वाजवला. यावरून संतप्त झालेल्या तरुणांनी बसमध्ये घुसून राडा घातला.४ ते ५ जणांनी मिळून एसटी चालक आणि वाहकावर हल्ला चढवला.
या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (bus)या प्रकरणानंतर नेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनुसार, पोलिसांनी जग्गू मेश्राम, तेजस राठोड, हर्षल बनकर आणि शुभम जगताप या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दरोडा टाकणे यासह गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात आले आहेत.
मारहाणीत वाहकाच्या हातातील १०,३६० रुपयांची रक्कमही कुणीतरी चोरून नेल्याचे समोर आले आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच १०,३६० रूपये नेमकं कुणी लंपास केला, याचाही तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :