सध्या सोशल मिडियावर स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवण्यासाठी अनेक तरुण-तरुणी काहीही करण्यास तयार असतात. इन्स्टाग्रावर रील्स बनवण्याचा ट्रेंड प्रचंड वाढलेला आहे. या ट्रेंडमुळे लोक आपले प्राण धोक्यात घालूनही रील्स तयार करताना दिसतात. असेच काहीसे घडले असून, धावत्या लोकल ट्रेनच्या दरवाजात लटकून रील्स(Reels) बनवणाऱ्या एका तरुणीचा हात घसरल्याने ती खाली पडली. ही घटना इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांच्याही काळजात भीती दाटली.

तरुणीचा स्टंट व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक पर्यटन स्थळ दिसत आहे. या पर्यटन स्थळी एक ट्रेन जात आहे आणि याच ट्रेनच्या दरवाजाला एक तरुणी लटकलेली आहे. दुसऱ्या ट्रेनच्या दरवाजातून एक व्यक्ती तरुणीचा रील्स(Reels) व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत आहे.
रील्स(Reels) व्हिडिओ काही सेंकद शूट केल्यानंतर तरुणीचा हात दरवाजातून सटकतो आणि ती धावत्या ट्रेनच्या खाली पडते. सुदैवाने ट्रेनचा वेग कमी आणि जमिनीचे अंतर जास्त नसल्याने तरुणी बचावली जाते. तरुणीची ही घटना सर्व पर्यटकांच्या समोर घडली आहे आणि सर्व प्रसंग रील्स व्हिडिओत कैद झाला.
तरुणींच्या धक्कादायक अपघाताचा हा व्हिडिओ munevvernizam या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ही घटना नेमकी कुठली आणि कधीची आहे ते अद्याप समजू शकलेले नाही, मात्र सध्या वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
हेही वाचा :
Suryakumar Yadav ने केली ‘निवृत्ती’ ची पोस्ट, चाहत्यांना धक्का! सोशल मीडियावर उडाली खळबळ
पिंपल्सपासून मिळेल कायमची सुटका! चेहऱ्यासाठी नियमित वापरा हे ऑइल
कोल्हापुरात पावसाचा कहर; बळीराजाला अक्षरश: रडवलं, पिकांचे अतोनात नुकसान