पावसामुळे IPL फायनल रद्द झाल्यास ‘हा’ संघ ठरणार विजेता! जाणून घ्या नियम

आयपीएल 2025 स्पर्धेची अंतिम लढत 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल(team )चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांसाठी ही पहिलीच ट्रॉफी जिंकण्याची संधी असल्याने सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार या दिवशी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता असून, सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे चाहत्यांमध्ये एकच प्रश्न उपस्थित झाला आहे — पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोणाला मिळणार विजेतेपद?

पावसामुळे फायनल पूर्ण होऊ न शकल्यास, 4 जून बुधवार हा रिझर्व्ह डे म्हणून निश्चित करण्यात आला आहे. (team )म्हणजेच, 3 जून रोजी सामना होऊ शकला नाही, किंवा पूर्ण झाला नाही, तर उर्वरित किंवा संपूर्ण सामना दुसऱ्या दिवशी होईल. IPL चे नियमानुसार अंतिम सामन्यासाठी हा रिझर्व्ह डे आवश्यक असतो, ज्यामुळे विजेता खेळूनच ठरावा.

मात्र जर रिझर्व्ह डे च्या दिवशीही 4 जून पावसामुळे सामना पूर्णपणे रद्द झाला, (team )आणि किमान 5 ओव्हरही प्रति डाव खेळवता आली नाही, तर मग पॉइंट्स टेबलमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेल्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल.यंदा पॉइंट्स टेबलनुसार, पंजाब किंग्ज संघ अव्वल स्थानावर होता, त्यामुळे अशा परिस्थितीत पंजाब किंग्जला आयपीएल 2025 ची ट्रॉफी मिळण्याची शक्यता आहे.

संघ : आरसीबी वि. पंजाब
तारीख: 3 जून, 2025
वेळ: संध्याकाळी 7.30 वाजता
टॉस: संध्याकाळी 7 वाजता
स्थळ : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

हेही वाचा :