कडाक्याच्या ऊन्हात एसी बंद पडला दुरूस्तीसाठी जाताच हातात आली सापांची पिल्ले video viral

कडाक्याच्या ऊन्हात बंद पडलेला एसी दुरूस्त करायला गेला, हातात (snakes)सापांची एक नाही तर अनेक पिल्लं आली, या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रखरखत्या ऊन्हामुळे बाहेर अंगाची लाही लाही होते, त्यामुळे अनेकजण एसी, फॅन अन् कूलरपुढे आराम करतात. पण बंद पडलेला एसी दुरूस्त करायला गेलेल्या व्यक्तीची चांगलीच फजिती झाली. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे? याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.

नेमके काय घडले?
विशाखापट्टणम जिल्ह्यातील एका घरातील एसी अचानक तो बंद पडला. सुरुवातीला तांत्रिक बिघाड समजून एसीच्या मालकाने स्थानिक तंत्रज्ञाला एसी दुरुस्तीसाठी बोलावले.मात्र, एसी दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीने एसीचे युनिट उघडताच त्याला एक विचित्र दृश्य दिसले,ज्या एसीच्या आत साप आणि त्याची ८-१० पिल्ले होती. (snakes)हा धक्कादायक प्रकार घरातील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

हा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड करताच लोकांनी हजारो लाईक्स केलेले आहे तर लाखोंच्या घरात लोकांनी व्हिडिओला व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत. आतापर्यंत एक्स प्लॅटफॉर्मवरच नाही तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (snakes)व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.

घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण!
विशाखापट्टणममधील व्हिडिओ व्हायरल होताच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले शिवाय नेटकऱ्यांमधूनही हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,”घरातल्यांना झोप नाही लागणार आता” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”पूर्णपणे मनाचा थरकाप उडाला” अशा अनेक भीतीदायक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

हेही वाचा :

अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; दोन बडे नेते राष्ट्रवादीत?

पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी

‘9 वर्षे हे सगळं सुरू…’ , गोविंदाचा ‘त्या’ गोष्टीबद्दल गौप्यस्फोट!

पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी