‘नैसर्गिक न्यायानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच’

 नैसर्गिक न्यायानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वक्तव्य भाजपा(natural) नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 132 जण निवडून आले. या व्यतिरिक्त निवडणुकीत जिंकून आलेल्या पाच जणांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 वर जाऊन पोहोचले आहे. राज्याच्या विधानसभेतील 288 पैकी 137 जागा भाजपाच्या आहेत. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वैयक्तिक मत असल्याचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

भाजपाच्या पक्ष शिस्तीनुसार राज्यात नेतृत्व कोण करणार ? या प्रश्नाचे उत्तर मोदी – शाह यांच्याकडून मिळेल अथवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतला जाईल. यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीतून ठरेल. पण वैयक्तिक मतानुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात, असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महायुतीने मुंबईत केलेली कामगिरी बघता लवकरच मुंबईत भाजपाचा महापौर दिसेल, असाही विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल

  1. एकूण 288 जागा
  2. महायुती 230 जागांवर विजय
  3. भाजपा 132 जागांवर विजय
  4. शिवसेना 57 जागांवर विजय
  5. राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
  6. महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
  7. उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
  8. काँग्रेस 16 जागांवर विजय
  9. शरद पवार गट 10 जागांवर विजय
  10. इतर 12 जागांवर विजय

जिंकून आलेल्या इतर बारा जणांपैकी पाच जणांनी भाजपाला तर तीन जणांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 आणि शिवसेनेचे संख्याबळ 60 झाले (natural)आहे. महायुतीचे एकूण संख्याबळ 238 वर पोहोचले आहे. 

मुंबईवर महायुतीचा झेंडा

मुंबई ही राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यापैकी 15 जागांवर भाजपाचा, सहा जागांवर शिवसेनेचा आणि एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. महायुतीने मुंबईतल्या 36 पैकी 22 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे गटाने मुंबईतल्या दहा जिंकल्या.

  1. भाजपाने जिंकलेल्या मुंबईतील 15 जागा – बोरीवली, दहिसर, मुलुंड, कांदिवली पूर्व, चारकोप, गोरेगाव, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, वांद्रे पश्चिम, सायन कोळीवाडा, वडाळा, मलबार हिल, कुलाबा
  2. शिवसेनेने जिंकलेल्या मुंबईतील 6 जागा – मागाठाणे, भांडुप पश्चिम, अंधेरी पूर्व, चांदिवली, चेंबूर, कुर्ला
  3. राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेली मुंबईतील एक जागा – अणुशक्तीनगर
  4. उद्धव ठाकरे गटाने जिंकलेल्या मुंबईतील 10 जागा -(natural) विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, कलिना, वांद्रे पूर्व, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा
  5. काँग्रेसने जिंकलेल्या मुंबईतील 3 जागा – मालाड पश्चिम, धारावी, मुंबादेवी
  6. समाजवादी पक्षाने जिंकलेली मुंबईतील एक जागा – मानखुर्द शिवाजीनगर

हेही वाचा :

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी

आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा

डॉक्टरांनी सुचवलेली 7 जादुई फळं फक्त 20 रुपयांत हाडांना बनवा लोखंडासारखी मजबूत