अभिनेत्री शोभिता धुलिपाला पडली नागा चैतन्यच्या प्रेमात?

सध्या सोशल मीडियावर टॉलिवूड अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या(love) रिलेशनची जोरदार चर्चा होत आहे. समांथा रुथ प्रभुसोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य शोभिताला डेट करत असल्याची चर्चा आहे. अद्याप दोघांनीही रिलेशनबद्दल अधिकृत भाष्य केलेले नाही. अशातच शोभिताने एका मुलाखतीमध्ये मी कायमच प्रेमात असते असं म्हणाली आहे. अभिनेत्रीच्या ह्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.

मुलाखतीमध्ये शोभिताला लव्हलाईफबद्दल प्रश्न(love) विचारण्यात आला होता. अभिनेत्रीने त्या प्रश्नावर उत्तर दिले की, “मी नेहमीच प्रेमात असते. प्रेम हे माणसासाठी एका उर्जेप्रमाणे काम करते. मला असं वाटतंय की, प्रेम गरज आणि मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. माझ्याकडे पाहून अनेकांना असं वाटतं की, मी खूप खंबीर आणि कठोर आहे.”

मुलाखतीमध्ये शोभिता पुढे म्हणाली, “मी आजवर जशा भूमिका साकारल्या आहेत, त्यापाहून अनेकांच्या मनात माझ्याबद्दल अशी प्रतिमा आहे. पण मी पूर्णपणे त्या विरोधात आहे. पण माझा स्वभाव शांत आणि थोडा खोडकर आहे. माझ्यासाठी प्रेम हे जगातील सर्वात शुद्ध गोष्ट आहे. माझ्या फारशा गरजा नाहीत.”

सध्या अभिनेत्रीची ही मुलाखत कमालीची चर्चेत आली आहे. पण अद्यापही अभिनेत्रीने तिच्या आणि नागाचैतन्यच्या रिलेशनबद्दल काहीही उघड केलेलं नाहीये. तिच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

हेही वाचा :

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आयसीसीची मोठी घोषणा

प्रतीक्षा संपली! सीबीएसई १० आणि १२ वीचा निकाल कधी लागणार? 

आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू, राहुल गांधींची मोठी घोषणा