रणबीर कपूर एकाच वेळी चार मुलींसोबत होता रिलेशनमध्ये

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत(relationship) असतो. रणबीरने बॉलिवूडच्या अनेक टॉपच्या अभिनेत्रींना डेट केलं आहे. यात दीपिका पादुकोण ते कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. एकेकाळी रणबीर प्लेबॉय होता. अभिनेत्याचे वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी स्वत: याचा खुलासा केला आहे. रणबीर कपूर एकेकाळी चार मुलींना डेट करत असल्याचा खुलासा त्याच्या वडिलांनी केला होता. त्यामुळे चॉकलेट बॉयला ‘प्लेबॉय’ असे म्हटले जाते.

ऋषी कपूर यांनी 2013 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आपला मुलगा रणबीर कपूरच्या डेटिंग(relationship) लाईफबद्दल भाष्य केलं होतं. रणबीरला प्लेबॉय ही इमेज मीडियाने दिली आहे. तो मुलींसोबत या वयात नाही फिरणार मग कधी फिरणार? मुलीला जर त्याच्यासोबत डेटवर जायचं असेल तर त्याने का जाऊ नये”.

ऋषी कपूर म्हणालेले,”आयुष्याचा जोडीदार निवडण्याची हीच योग्य वेळ आहे. रणबीर सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करतो. आता तो A,B,C,D ला पाहत आहे. रणबीर प्लेबॉय आहे याचा अर्थ तो एकसाथ चार मुलींना डेट करतोय असा त्याचा अर्थ होत नाही”.

ऋषी कपूर पुढे म्हणालेले,”घरात अनेक महिला येतात. यात डिझायनर, स्टायलिस्ट, हेअर ड्रेसर, सहाय्यक अशा अनेक महिलांचा समावेश आहे. रणबीरने कोणत्याही मुलीला धोखा द्यायला नाही पाहिजे. गर्लफ्रेंडला धोका देण्याची ही योग्य पद्धत नाही”.

रणबीर कपूर 2023 मध्ये रिलीज झालेल्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात शेवटचा झळकला होता. त्याचा हा चित्रपट चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दणदणीत कमाई केली. रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात तो प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसत आहे.

रणबीर कपूर हा आघाडीचा बॉलिवूड अभिनेता आहे. ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांचा तो मुलगा आहे. रणबीरचे अॅनिमल, ब्रह्मास्त्र, तू झुठी मैं मक्कार, ये जवानी है दिवानी असे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. आता त्याच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

हेही वाचा :

हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार

रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये का घेतलं नाही? पियुष चावलाने केला खुलासा

पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच