फडणवीसांना मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधानपदाचं स्वप्न पडलं; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान पदाचं स्वप्न(pipe dream) पडलं, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. काल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी जे सांगितले आहे, ते शंभर टक्के सत्य(pipe dream) आहे. उद्धव ठाकरे यांची जी चर्चा झाली, त्यानुसार आमचे संबंध खूप चांगले होते. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरती बसून मी दिल्लीत जाईन. दिल्लीत अर्थमंत्री होईल, दिल्लीत गृहमंत्री होईल आणि मी प्रधानमंत्री होईल, असं त्यांचं स्वप्न मोठं होतं. ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

आम्ही प्रधानमंत्री पदावरती कधी चर्चा करत नाही. करण्याची गरज नाही, पण आमच्याकडे खूप चेहरे आहेत. त्यातला एखादा चेहरा प्रधानमंत्री होईल. आमची इच्छा आहे, राहुल गांधी त्यांनी नेतृत्व करावं, देशात राहुल गांधी प्रचार करत आहेत. इंडिया आघाडीचा प्रचार करत आहेत पण त्यांना सत्तेचा लोभ नाही, असं संजय राऊत म्हटले आहेत.

प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की, मी गुन्हा केला नाही. हा मानवी स्वभाव आहे. त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीस सुद्धा वेगळे नाहीत , अशी राऊतांनी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या नेत्याला देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल, तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतो. पण त्यांचं हे स्वप्न बहुदा मोदी आणि शहा यांना आवडलं नाही. स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केलं, असं एकंदरीत जे काही राजकारण आम्हाला कळतं, त्यानुसार दिसत असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

मोठं स्वप्न जेव्हा फडणवीस पाहायला लागले. तेव्हा मोदी आणि शाह यांनी काहीतरी निर्णय घेतला. महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनिअर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं. यालाच मोदी आणि शाह यांची राजनीती म्हणतात असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

हेही वाचा :

पोस्टरवर राज ठाकरे, पण प्रेसनोटमधून पक्ष गायब, श्रीकांत शिंदेंना मनसे पाठिंबा देणार?

बजाज पुढील महिन्यात भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणणार

‘महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर..’; उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंचा पलटवार!