पोस्टरवर राज ठाकरे, पण प्रेसनोटमधून पक्ष गायब, श्रीकांत शिंदेंना मनसे पाठिंबा देणार?

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत यांनी(poster) गेल्या दहावर्षाच्या कालावधीत या मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई कला मंदिर नाट्यगृहात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याच अहवालाचे पोस्टर व्हायरल झाले असून या पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो सुद्धा लावण्यात आला आहे. तर जी प्रेसनोट काढण्यात आली. त्यात मात्र मनसे पक्षाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे मनसे श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देणार का हा सवाल उपस्थिती केला जात आहे.

दरम्यान, खासदार शिंदे यांच्या अहवालाच्या प्रकाशन(poster) सोहळ्यावर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देत सांगितले की, डोंबिवलीत विकास तर काय झालेला दिसत नाही. कार्य अहवालात विकास कोणता दाखवतात ते अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यानंतरच त्यावर भाष्य करेन अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे दरेकर यांनी खासदार शिंदे यांना डिवचल्याचं बोललं जात आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी गेल्या दहावर्षाच्या कालावधीत मतदारसंघात जी विकासकामे केली आहेत. या सर्व विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा असलेल्या ‘विकासदशक – दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची’ या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत रविवार, २१ एप्रिल रोजी डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण तसेच स्थानिक भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याच अहवालाचे पोस्टर व्हायरल झाले असून यावर पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो सुद्धा लावण्यात आला आहे. तर जी प्रेसनोट काढण्यात आली त्यात मात्र मनसे पक्षाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे मनसे श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देणार का हा सवाल उपस्थिती केला जात आहे.

हेही वाचा :

बजाज पुढील महिन्यात भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणणार

‘महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर..’; उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंचा पलटवार!

हनीमूनला जाताना ऐश्वर्या राय हिला ‘या’ मोठ्या गोष्टीची झाली जाणीव, अभिषेक बच्चनही..