‘स्टम्प दांडिया’नंतर रोहित Retirement बद्दल मैदानातच विराटला म्हणाला, ‘अब हम कोई…’

भारताने रविवारी म्हणजेच 9 मार्च रोजी दुबईच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेट(cricket) स्टेडियमवर न्यूझीलंडच्या संघाला 4 विकेट्सने पराभूत करुन तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला. या विजयानंतर भारतीय संघातील दोन महत्त्वाचे आणि सर्वात अनुभवी खेळू असलेले विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मनसोक्त जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. या विजयाला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही सेलिब्रेशनचे स्टेटस आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

खरं तर रविवारी रविंद्र जडेजाने चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर संपूर्ण भारतीय संघाने मैदानावर धाव घेतली. आधी ड्रेसिंग रुममध्ये एकमेकांना मिठ्या मारुन आनंद व्यक्त केल्यानंतर रोहित, विराटसहीत संपूर्ण संघच मैदानाच्या दिशेने धावल्याचं दिसून आलं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनेही (cricket)पीचकडे धाव घेत स्टॅम्प हातात घेतले. त्यानंतर दोघांनीही मैदानातच स्टॅम्पने दांडिया खेळल्याचंही पाहायला मिळालं. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. अनेकांच्या सोशल मिडिया अकाऊंट्सपासून ते स्टेटसपर्यंत सगळीकडेच हा व्हिडीओ पाहायला मिळाला.

दरम्यान, या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशननंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांच्या गळ्यात गळा घालून चालत असताना दोघांमध्ये काय संवाद झाला हे सुद्धा कॅमेरात कैद झालं आहे. या स्पर्धेनंतर रोहित आणि विराट किंवा दोघांपैकी कोणीतरी एकजण निवृत्ती जाहीर करेल अशी धाकधूक चाहत्यांच्या मनात होती. मात्र या शक्यतेची खिल्ली रोहितनेच विराटबरोबर गप्पा मारताना उडवल्याचं पाहायला मिळालं. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर या दोघा दोस्तांमध्ये काय चर्चा झाली याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये केलेल्या सुमार कामगिरीमुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती. त्यांच्या वयाचा संदर्भ देत टीका केली जात होती. दोघांनीही आता निवृत्त झालं पाहिजे असं अनेकांनी या मालिकांनंतर म्हटलेलं. मात्र दोघांनीही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी पहिल्या सामन्यापासून भारताच्या विजयामध्ये आपल्या उपस्थितीची छाप सोडत चाहत्यांची मनं जिंकली. विराटने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं तर रोहितनेही अंतिम सामन्यात 70 हून अधिक धावा करत विजयात मोलाचा हातभार लावला.

हेही वाचा :

अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; दोन बडे नेते राष्ट्रवादीत?

पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी

‘9 वर्षे हे सगळं सुरू…’ , गोविंदाचा ‘त्या’ गोष्टीबद्दल गौप्यस्फोट!