निवडणूक जिंकताच सुप्रिया सुळे यांचं अजितदादांना खुलं आव्हान, आता थेट…
लोकसभा निवडणुकीत अनेक लढती महत्वाच्या होत्या. या निवडणुकीत(politics) केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीच्या निवडणुकीकडे लागलं होतं कारण इथे पवार वि. पवार अशी लढत होती. शरद पवार यांची कन्या , खासदा सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या दोघीही बारामतीमधून एकमेकींच्या समोर उभ्या होत्या.
अखेर या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्याने(politics) विजय झाला आणि त्यांनी सुनेत्रा पवार यांना धूळ चारली. खासदारकीची ही निवडणूक जिंकल्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना खुलं चॅलेंज दिलं आहे. अजित पवार यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथील छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक लढविणार असण्याच त्यांनी जाहीर केलं. कारखाना लढवायचा, जिंकायचा आणि रुळावर आणायचा असे निर्धार त्यांनी भरसमभेत कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.
अजित पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीची सुरुवात ज्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरुवात झाली, त्या मूळ उगमस्थानावरच निवडून येण्याचा सुप्रिया सुळे यांनी निर्धार व्यक्त केला आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसांवरचं आली असून त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचं हे विधान महत्वाचं ठरतंय.
बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड आणि इंदापूर मधील स्वागत पाहून मला पहिल्यांदाच निवडून आल्यासारखे वाटले. आज स्वागताला जो माहौल होता, तसा माहोल कधीच पाहिला नाही. पाहून असं माहोल कधीही पाहितला नाही. आपले 10 पैकी 8 उमेदवार निवडून आले.साताऱ्यामधील उमेदवार देखील निवडून आला असता परंतु तेथील पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराने 46 हजार मतं घेतली. भवानीनगर कारखाना आपल्याला आता लढायचा आहे आणि जिंकायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
इथेनॉल बद्दल पहिल्यांदाच संसदेत मी बोलले. दुधाचा भाव शेतकऱ्यासाठी वाढवा नाहीतर पुढील 10 दिवसात दूध आणि कांदा यासाठी हमीभाव दिला नाही तर आंदोलन करायचे आहे. बेरोजगारी, महागाई याला कंटाळून लोकांनी मतदान दिलंय.* काही दिवसांनी बारामतीवर मिर्झापुर सारखी फिल्म काढू . टीव्ही सिरीयल प्रमाणे सकाळपासून अनेक बदल निवडणूकित पाहिले. बूथ कमिटी नावं देखील आम्ही गुपित ठेवली, अनेक तालुक्यात असं वाटलं की आम्हांला माणसे मिळाली नाहीत .
एकाच माणसाला बारामती मतदारसंघ माहीत होतं त्यांचे नाव शरद पवार. श्रीनिवास दादा आणि आम्ही अनेक ठिकाणी गेलो आणि लोकांनी दरवाजे बंद केले, कारण लोकांना अडचणी व दहशतहोती, परंतु त्यालाच लोकांनी मतदानातून उत्तर दिलंय. शरद पवार आणि आमच्यासाठी लोकांनी त्रास सहन केला. लोकांना व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवले तरी अडचणी येत होत्या. पण असो, झालं गेलं गंगेला मिळालं, आता लोकांना मदत करायची आहे. कोणत्याही माणसाला अडचण येऊ देणार नाही आणि वीज ,पाणी मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीवरून त्रास झाला तर सुप्रिया सुळे ढाल बनवून उभी राहील , असे आश्वासन त्यांनी दिलं.
हेही वाचा :
तुरुंगात बंद असलेला आरोपी खासदार म्हणून आला निवडून
विश्वजीत कदम: काँग्रेसला 99 वरून थेट ‘सेंच्युरी’वर नेलं..
इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चालला आहे.