60 हजारांमध्ये खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कटूर; ‘ही’ कंपनी देतेय मोठा डिस्काउंट!

भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर (escooter) मार्केट अगदी वेगाने वाढत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. मात्र, या स्कूटरच्या किंमती अजूनही इतर स्कूटरच्या तुलनेत अधिक असल्याचं कित्येकांचं मत आहे. यातच Gemopai या कंपनीने आपल्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. यामुळे अवघ्या 60 हजार रुपयांपासून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येणार आहे.

भारतात इलेक्ट्रिक स्कूटर(escooter) म्हटलं की ओला, एथर या दोनच कंपन्यांची नावं समोर येतात. मात्र आणखीही बऱ्याच कंपन्या चांगल्या दर्जाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स तयार करत आहेत. Gemopai कंपनीने या स्पर्धेत टिकण्यासाठी कमी किंमतीत हाय-क्वालिटी इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून दिल्या आहेत.

या कंपनीच्या Astroid Lite या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तब्बल 200 किलोमीटरची रेंज मिळते. तसंच तीन सेकंदांमध्ये ही स्कूटर 0 ते 40 किलोमीटर एवढा स्पीड पकडते. यामध्ये सेंट्रल लॉकिंग सारखे फीचर्स मिळतात. या स्कूटरला 1,11,195 रुपयांना लाँच करण्यात आलं होतं. मात्र आता याची नवी किंमत 99,195 रुपये एवढी करण्यात आली आहे.

Ryder SuperMax या स्कूटरमध्ये 100 किलोमीटर रेंज मिळते. मात्र यामध्ये 60 किलोमीटर प्रतितास एवढा टॉप स्पीड मिळतो. ही स्कूटर 79,999 रुपयांना लाँच करण्यात आली होती. यावर आता तब्बल 10 हजारांची सूट देण्यात येत आहे. यामुळे स्कूटरची नवी किंमत 69,999 रुपये झाली आहे.

कंपनीने आपल्या Ryder मॉडेलमध्ये सगळ्यात जास्त डिस्काउंट जाहीर केला आहे. 120 किलोमीटर रेंज असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 70,850 रुपये होती. आता ही किंमत 59,850 रुपये एवढी झाली आहे. कॅशबॅक ऑफर अंतर्गत ही सूट दिली जात आहे.

हेही वाचा :

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील भारतीयांसाठी दुतावासाकडून ॲडव्हायजरी जारी

‘माझ्या आयुष्याचे एकच ध्येय सलमान खानला जीवे मारणे’ लॉरेन्स बिश्नोई याने थेट..

शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस ‘हे मन बावरे’नंतर पुन्हा एकत्र दिसणार? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण