मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा भक्त आहे असं विधान केल्याने मराठी अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे सध्या चर्चेत आहेत. महेश कोठारे(Marathi actor) यांना जाहीर मंचावरुन हे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत पुढच्या वर्षी भाजपाचं कमळ फुलेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. यानंतर महेश कोठारे यांनी ‘झी 24 तास’शी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

नरेंद्र मोदींचा भक्त असल्याचं वक्तव्य कऱण्यामागील भावना विचारली असता महेश कोठारे म्हणाले की, “जे माझ्या मनात आहे ते मी सांगितलं. मोदींमुळेच भारतात जी प्रगती झाली आहे, विश्वात जे स्थान निर्माण झालं आहे ते मला मनापासून आवडतं. त्यामुळेच मी मोदींचा भक्त आहे आणि ते मत मी व्यक्त केलं आहे. आपलं मत व्यक्त करण्याचं प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे”.राऊतांच्या टीकेवर बोलताना त्यांनी सांगितलं की, “सिनेमे पाहण्याचा प्रश्न इथे येत नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. महेश कोठारे मराठी माणूस आहे आणि तात्या विंचूदेखील मराठी माणूसच आहे”.
दरम्यान भाजपाकडून ऑफर आली तर? किंवा राजकारणात प्रवेश करणार का? असं विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं की, “नाही, माझी राजकारणात जाण्याची माझी अजिबात इच्छाही नाही आणि तसा हेतूही नाही. नागरिक म्हणून मला जे वाटतं ते मी केलं आहे. एक नागरिक म्हणून माझं ते वक्तव्य आहे. आपल्या देशात लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य आहे त्यामुळे प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी कोणावरही टीका केली नसून, फक्त माझं मत मांडलं आहे”.
मोदीभक्त आहोत या विधानामागील कारणाचा उलगडा करताना त्यांनी सांगितलं की, “नरेंद्र मोदींवर लोक टीका का करतात हे मला कळत नाही. त्या माणसाने खरोखरच काम केलं आहे. जो भारत 2014 च्या आधी होता आणि आताचा आहे त्यात फरक आहे. मुंबईत 25 वर्षांपूर्वी मेट्रो यायला हवी होती, ती आता आली आहे. इतक्या जोरात त्याचं काम सुरु आहे. मुंबईत पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. मुंबईची काळजी कोणी घेतली नव्हती ती घेतली जात आहे. त्यामुळे या सरकारने केलेलं काम कौतुक करण्यासारखं आहे असं वाटलं. त्यामुळे जे मला वाटलं ते मी बोललो”.
मी माझं वैयक्तिक मत मांडलं. दिवाळी पहाटला मी दरवर्षी जातो. मी मागील 10 ते 15 वर्षांपासून तिथे जात आहे. निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळावी अशी माझी इच्छा आहे असंही त्यांनी सांगितलं(Marathi actor).मराठी मुद्द्यावर अभिनेते न बोलण्याच्या टीकेवर त्यांनी म्हटलं की, “मराठीचा काय मुद्दा आहे? मराठीचा आपल्याला, प्रत्येक मराठी माणसाला अभिमन आहे. त्याबाबतीच काही प्रश्नच नाही. मला मराठी भाषेचाही अभिमान आहे”.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर बोलण्यास नकार देताना, “त्यांनी आपण कोणतंही राजकीय विधान करणार नसल्याचं म्हटलं आहे. मी फक्त माझं मत मांडलं असून, त्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. मी नागरिक म्हणून मतव्यक्त केलं आहे. त्यामुळे काय होईल, काय झालं यात मला रस नाही. मी माझ्या मतावर ठाम आहे. मो मोदींचा निर्विवाद भक्त आहे”.
हेही वाचा :
85 वर्षाच्या आजीने ऋषिकेशमध्ये केलं बंजी जम्पिंग, VIDEO तुफान व्हायरल
लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये ,भाऊबीजला सरकारकडून खास ओवाळणी
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….