..अन् मैदानात रोहित शर्माची पॅण्टच सरकली! CSK vs MI सामन्यातील ‘तो’ Video व्हायरल

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रविवारी सायंकाळी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर(pants) किंग्जदरम्यानच्या सामन्यामध्ये एक मजेदार घटना घडली. नाणेफेक जिंकून पंड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड तुफान फटेबाजी करत होता. याचवेळी एका क्षणी ऋतुराजने मारलेला चेंडू कॅच करण्याच्या नादात रोहित शर्माची पॅण्टच घसरली.

सामन्यातील 12 व्या ओव्हरमध्ये(pants) हा प्रकार घडला. आकाश मधवाल गोलंदाजी करत होता. आकाशने एक अखूड टप्प्याचा चेंडू टाकला. तुफान फटकेबाजी करताना ऋतुराजने हा अखूड टप्प्याचा चेंडू मीड विकेटवरुन टोलवला. रोहितने हवेत टोलवण्यात आलेला हे चेंडू पाहून त्याच्या उजवीकडे धावण्यास सुरुवात केली. अखेर चेंडूपर्यंत पोहचण्यासाठी त्याने डाइव्ह मारली.

झेप घेत दोन्ही हातांनी बॉल पकडण्याचा प्रयत्न रोहितने केला. मात्र हा चेंडू रोहितच्या हातून सुटला. पण या साऱ्या धावपळीत रोहितने डाइव्ह टाकल्याने त्याची पॅण्ट(pants) कंबरेपासून खाली सरकली. त्यानंतरही रोहितने एका हाताने पॅण्ट वर ओढत उजव्या हाताने आधी बॉल विकेटकीपरकडे फेकण्याचं प्रसंगावधान दाखवलं.

रोहितच्या हातून हा कठीण झेल सुटला तेव्हा ऋतुराज 30 बॉलमध्ये 39 धावांवर खेळत होता. ऋतुराजचा हा सुटलेला झेल मुंबईला नंतर चांगलाच महागत पडला. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 69 धावांची खेळी केली.

सामान्यपणे रोहित शर्मा 30 यार्डाच्या सर्कलच्या आतच फिल्डींग करतो. मात्र यंदाच्या पर्वात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना रोहित शर्मा अनेक सामन्यांमध्ये अगदी सीमारेषेजवळ फिल्डींग करताना दिसून आला आहे. फलंदाजीसंदर्भात बोलायचं झालं तर सहा सामन्यांमध्ये रोहितने 261 धावा केल्या आहेत. यामध्ये चेन्नई विरुद्धच्या सामन्यातील 63 बॉलमध्ये नाबाद 105 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने चौथ्य स्थानी झेप घेतली आहे. मात्र रोहितच्या शतकानंतरही मुंबईला हा सामना जिंकता आला नाही.

आयपीएलच्या 29 व्या सामन्याचा टॉस मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने जिंकला. पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 69 धावांची खेळी केली. शिवम दुबेने नाबाद 66 धावांची खेळी केली. महेंद्र सिंह धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर शेवटच्या 4 बॉलमध्ये 3 षटकरांच्या मदतीने 20 धावा कुटल्या आणि संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली. मुंबईकडून हार्दिकने पंड्याने 43 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. श्रेयस गोपाल, गेराल्ड कोएत्झीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

207 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला 186 धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहित शर्माने झळकावलेलं शतक संघाच्या विजयाच्या कामी आलं नाही. रोहित 63 बॉलमध्ये 105 धावा करुन नाबाद राहिला. रोहितला तिलक वर्मा वगळता कोणीच फारशी साथ दिली नाही. एकीकडे रोहित फटकेबाजी करत असताना दुसऱ्या बाजूला वेळोवेळी विकेट्स पडत राहिल्या.

https://twitter.com/i/status/1779527075906392408

चेन्नईच्या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी केल्याने मुंबईच्या फलंदाजांना चौकार, षटकार लगावता आले नाहीत. गोलंदाजांनी जाणूनबुजून लांब पल्ल्याच्या बॉण्ड्रीच्या दिशेने गोलंदाजी केल्याने मुंबईच्या फलंदाजांना धावगती वाढवण्याची गरज होती तेव्हा सामाधानकारक धावा करता आल्या नाहीत. चेन्नईकडून मथीशा पाथिरानाने 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे, मुस्ताफिझूर रहमानने प्रत्येकी एक विकेट घेतली. चेन्नईचा हा चौथा विजय ठरला आहे.

हेही वाचा :

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील भारतीयांसाठी दुतावासाकडून ॲडव्हायजरी जारी

‘माझ्या आयुष्याचे एकच ध्येय सलमान खानला जीवे मारणे’ लॉरेन्स बिश्नोई याने थेट..

शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस ‘हे मन बावरे’नंतर पुन्हा एकत्र दिसणार? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण