ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शेकडो शिवसैनिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अनेक धक्के बसत आहे.(hundreds )पक्षाला सुरु असलेली गळती थांबत नाही. नाशिक आणि पुणे येथील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सोमवारी प्रवेश घेतला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता. तसेच कोकणातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधवही नाराज आहेत. त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. आता सांगलीमधून उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. मिरज शहर प्रमुखासह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला राष्ट्रवादी अजित पवार गटाने धक्का दिला आहे. मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. (hundreds )वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीमध्ये मिरजेमध्ये पक्ष प्रवेश पार पडला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून चंद्रकांत मैंगुरे यांची ओळख आहे. त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील पक्ष प्रवेशामुळे मिरजेतील शिवसेनेला खिंडार पडले आहे.

सांगलीतील जैन समाजाचे नेते आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात 12 वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत.(hundreds ) मुंबईमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश पार पडणार आहे.

रावसाहेब पाटील हे जैन समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य असून सांगली जिल्ह्यातील समाजाचे नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील जैन समाजाच्या सर्वात मोठी संघटना असणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष देखील ते आहेत. सामाजिक कार्याबरोबर शैक्षणिक व सहकार क्षेत्रामध्ये रावसाहेब पाटील यांचे मोठे कार्य आहे.

हेही वाचा :